Gulabrao Patil : ‘त्यांची अक्कल फार मोठी असेल..’ गुलाबराव पाटील यांचं पक्षातल्याच आमदाराला उत्तर, शिंदेंच्या दोन आमदारांमध्ये जुंपली

Gulabrao Patil : "आनंदराज आंबेडकर यांच्या मनात अजित पवारांबाबत बोलताना त्यांच्या मनात तसा भाव नसावा. जर अशा प्रकारे झालं असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला काही हरकत नाही"

Gulabrao Patil : त्यांची अक्कल फार मोठी असेल.. गुलाबराव पाटील यांचं पक्षातल्याच आमदाराला उत्तर, शिंदेंच्या दोन आमदारांमध्ये जुंपली
Gulabrao Patil
| Updated on: Nov 23, 2026 | 1:52 PM

“मराठवाड्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने धरणात पाणी नाही. संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. टँकरने पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे त्याची वाढ होत आहे” असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. निलेश चंद्रमुनी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुद्धा गुलाबराव पाटील बोलले. “सध्याची गरज तीच आहे बाळासाहेब ठाकरे यांनी देखील लिपस्टिक पर्समध्ये ठेवण्या ऐवजी मिरची पावडर ठेवायला हवी असं म्हटलेलं. मुलींना त्रास होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे
मुलींनी स्वतःच्या संरक्षणासाठी मुलींनी काळजी घेण्याची गरज आहे” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“आनंदराज आंबेडकर यांच्या मनात अजित पवारांबाबत बोलताना त्यांच्या मनात तसा भाव नसावा. जर अशा प्रकारे झालं असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला काही हरकत नाही” असं गुलाबराव पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी आरोप केला की, एनडीएच्या खासदारांना वळवण्यासाठी दीडशे कोटीचा भाव दिला. “संजय राऊतच गेले होते पैसे मोजायला. सेंट्रल बँकेचे ते मॅनेजर आहेत” सुप्रिया सुळे यांनी डी लिमिटेशन बिल समोर आल्यानंतर निर्णय घेणार असं वक्तव्य केलं आहे. “तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी काय निर्णय घ्यावा तो त्यांनी घ्यावा. त्यांचा पक्ष निर्णय घेईल आणि सर्वांना कळेल”

Loading...

त्यांची अक्कल त्यांना लखलाभ

आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं मला अक्कल शिकवू नये त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “त्यांची अक्कल फार मोठी असेल. धन्यवाद माझा मोठा मुलगा असल्यामुळे डबलची अक्कल त्यांना असेल. मी काय केलेलं आहे, काय मध्यस्थी केलेली आहे, सर्व जगाला माहिती आहे””त्यांना वाटत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं मुख्यमंत्र्यांना आपली गोष्ट सांगावी. त्यांचं म्हणणं आता असेल की कोणी आम्हाला अक्कल शिकवू नये तर त्यांची अक्कल त्यांना लखलाभ” एकनाथ खडसे यांनी घोडा मैदान जवळ आहे असं वक्तव्य केलं. गुलाबराव पाटील म्हणाले की, “बघून घ्या…बारा जागा आल्या आहेत आमच्या.. बघून घ्या..”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us