AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बांगलादेशी महीला लॉजवर पकडल्या पण…,’ नितेश राणेंचा सनसनाटी आरोप काय?

मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी गंभीर आरोप करत इशारा दिला आहे.

'बांगलादेशी महीला लॉजवर पकडल्या पण...,' नितेश राणेंचा सनसनाटी आरोप काय?
| Updated on: Jan 20, 2025 | 9:23 PM
Share

मंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. कणकवलीत ज्या दोन बांगलादेशी महीला पकडल्या त्या एका लाॅजवर पकडल्या मात्र त्या रेल्वे स्टेशनला पकडल्या गेल्याचं दाखवण्यात आलं असा आरोप यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

कणकवलीत ज्या दोन बांगलादेशी महीला पकडल्या त्या एका लाॅज वर पकडल्या मात्र त्या रेल्वे स्टेशनला पकडल्या गेल्याचं दाखवण्यात आलं. मात्र या मागचा सूत्रधार आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.  बांगलादेशाच्या दोन महिला येथे येतात, त्यांना कोण आणतं? त्यांना कुठे ठेवलं जातं, का खोटं बोललं जातं, ही जी काही मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे, त्या जिहादी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही. त्या मानसिकतेला प्रशासनाच्या माध्यमातून ठेचण्याचं काम आम्ही करू आणि ते तुम्हालाही दिसेल, आमच्या जिल्ह्यात ड्रग्ज आणण्याचं काम करणारे हात कापले जातील, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात प्रशासनामध्ये बीड लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आली आहे. त्या संदर्भात कलेक्टर यांना माहिती द्यायला सांगितली आहे, कोणाची मक्तेदारी आणि दादागिरी येथे चालत असेल, बीड आपल्या राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचे नाव वापरून आपल्या जिल्ह्यात अगर कोण मस्ती करत असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू. आम्ही मॅनेज न होणारी लोक आहोत, आम्हाला विकत घेण्याची कोणाची क्षमता नाही.

माझ्या जिल्ह्याची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. नियमांमध्ये राहुन काम करा असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिले जाईल. नियमबाह्य कोणी इथे काम करत असेल, त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...