
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गाैरी पालवे गर्जे यांनी वरळीतील घरात आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला गेला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली. गाैरी गर्जेच्या आत्महत्येनंतर धक्कादायक आरोप केली जात आहेत. पंकजा मुंडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले. गाैरी गर्जेच्या आत्महत्येनंतर तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली. मध्यरात्री वरळी पोलिसांनी गाैरी पालवे हिचा पती आणि पंकजा मुंडेचा पीए अनंत गर्जेला अटक केली असल्याची माहिती मिळतंय. मात्र, या प्रकरणातील अजून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली की, नाही याबद्दल माहिती मिळू शकली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजता अनंत गर्जेला वरळी पोलिसांच्या पथकाने अटक केली. गाैरी गर्जे हिला रूग्णालयात स्वत: अनंत गर्जे घेऊन गेला होता. यादरम्यान त्याने तिच्या आई वडिलांना फोन करून गाैरीने आत्महत्या केल्याचे सांगितले. हेच नाही तर त्याने यादरम्यान पंकजा मुंडेंच्या दुसऱ्या एका पीएलाही फोन केला होता. त्याने गाैरीने आत्महत्या केल्याचे सांगितले आणि तो रडत होता. पंकजा मुंडेंनी याबद्दल त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात उल्लेख केला.
गाैरी गर्जे हिच्या कुटुंबियांकडून अनेक गंभीर आरोप अनंत गर्जे आणि त्याच्या बहीण भावावर करण्यात आली. किरण इंगळे नावाच्या महिलेसोबत अनंतचे अफेअर सुरू होते आणि याची कल्पना गाैरीला लागली. यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू होता. हेच नाही तर गाैरीने त्याला माफही केले होते. मात्र, तो चॅटिंग करत असल्याचे तिच्या लक्षात आल्याने ती त्रासात होती. हेच नाही तर गर्भपाताचा एक रिपोर्टही गाैरीला मिळाला होता. ज्यामध्ये पतीच्या नावे अनंत गर्जेचे नाव होते.
गाैरीने या सर्व गोष्टींची कल्पना आपल्या कुटुंबियांना दिली. गाैरीला अनंतने अनेकदा मारहाण केल्याचेही कळतंय. गाैरी आणि अनंत यांच्यातील सततच्या वादानंतर अचानक गाैरीचे आई वडील बीडहून थेट त्यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी गाैरीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वळ त्यांना दिसून आले. आता वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला 11 वाजता कोर्टात हजर केले जाईल.