AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रताप सरनाईक यांचा चांगला निर्णय, जखमी गोविंदासाठी केली मोठी घोषणा

प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीच्या दिवशी चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी जखमी गोविंदासाठी मोठी घोषणा केली आहे.

प्रताप सरनाईक यांचा चांगला निर्णय, जखमी गोविंदासाठी केली मोठी घोषणा
pratap sarnaikImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 3:21 PM
Share

मुंबई, ठाण्यात दहीहंडीची उंची आणि पथकांचे थर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतो. या वर्षीची दहीहंडीची जोरदार चर्चा होत आहे. यंदाही दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी गोविंदा नागेश भोईर थरावरुन कोसळून जखमी झाला होता. 2009 साली घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोविंदा नागेश भोईर हा गंभीर जखमी झाला. तेव्हापासून नागेश हा अंथरुणात खितपत पडला आहे. या गोविंदा नागेशच्या उपचाराचा खर्च उचलण्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

भिवंडीतील गोविंदा नागेश भोईर याचा अवघ्या 24 व्या वर्षी दहीहंडीच्या थरावरून कोसळून अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गेली 18 वर्षे नागेश भोईर हा अंथरुणात आहे. काही दिवसांपूर्वी याच नागेशने आर्थिक मदत देण्यापेक्षा उपचारांचा खर्च शासनाने उचलण्याची मागणी केली होती.

नागेशचा भिवंडीत दहीहंडी उत्सवादरम्यान अपघात झाला होता. तो 2009 साली दहीहंडीच्या थरावर चढताना जमिनीवर कोसळला होता. या अपघात मणक्याला दुखापत झाली होती. दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपाचारानंतर त्याला कायमचं अपंगत्व आलं. दुर्घटनेनंतर त्याला स्वत:च्या पायावर उभे राहायला जमलेच नाही. अपघातामुळे सामान्य व्यक्तीसारखं जगण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं.

गोविंदा नागेश भोईर याने सोशल मीडियावरून दहीहंडीमधील कटू प्रसंग सांगितले होते. त्याने दहीहंडीमधील दुर्घटनेनंतर आयुष्य बदलून गेल्याचे सांगितले. दहीहंडीतील अपघातामुळे रुग्णालयातील उपचाराचा खर्च उचलणे देखील अवघड झाल्याचे सांगितले. सुरुवातीला त्याला अनेकांनी मदत केली. मित्र मंडळी धावून आले. परंतु काही वेळानंतर मिळणारी मदत कमी झाल्याचेही अधोरेखित केले. गेल्या काही दिवसांपासून नागेश हा उपचाराच्या खर्चाची मागणी सरकारकडे करत होता. त्यानंतर त्याच्या मदतीला मंत्री प्रताप सरनाईक धावून आले. गोविंदा नागेश भोईर याच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. संस्कृतीची दहीहंडी उत्सव सुरू असताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली. यावेळी त्यांनी कुटुंबाला पाच लाख रुपयांची देखील मदत करणार असल्याचे जाहीर केले.

Follow Us
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान