AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या साताऱ्याला अभिमान वाटेल अशी कृती… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करताच शंभूराज देसाई यांनी घेतला मोठा निर्णय; तुमचीही छाती गर्वाने फुगेल

Shambhuraj Desai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. यानंतर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अख्ख्या साताऱ्याला अभिमान वाटेल अशी कृती... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करताच शंभूराज देसाई यांनी घेतला मोठा निर्णय; तुमचीही छाती गर्वाने फुगेल
Shambhuraj DesaiImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 12, 2026 | 3:43 PM
Share

मुंबई, दि. 12 मे : देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन,खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री, पालकमंत्री, सातारा जिल्हा शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

शंभूराज देसाई यांचा परदेश दौरा रद्द

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबिक परदेश सहल ठरविण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला होता. मात्र, देशहिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देसाई यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे…

मंत्री देसाई यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात स्वागत होत असून “देश प्रथम” या भूमिकेचे हे उदाहरण मानले जात आहे. वैयक्तिक आनंद आणि सुट्टीपेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची चर्चा आहे. देशहिताला प्राधान्य, जबाबदारीची जाणीव आणि साधेपणाचा संदेश देत शंभूराज देसाई यांनी माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला ऊर्जा वाचवण्याचे आणि देशातील पैसा देशातच ठेवण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना परदेशी प्रवास टाळण्याचे, परदेशात लग्न करण्याचे आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं न खरेदी करण्याचेही आवाहन केले आहे. या सर्व आवाहनांना प्रतिसाद देत आता मंत्री शंभूराज देसाई यांनी परदेश दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?