AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात भूकंप! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, थेट खासदारांनंतर आमदारही वेगळी भूमिका घेणार, थेट खळबळ..

शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. तब्बल 6 खासदारांनी वेळा मार्ग स्वीकारला आहे. ज्याने एकच खळबळ उडाली. आता खासदारांनंतर आमदारही बंडखोरीच्या भूमिकेत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

राजकारणात भूकंप! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, थेट खासदारांनंतर आमदारही वेगळी भूमिका घेणार, थेट खळबळ..
Uddhav Thackeray
| Updated on: Jun 19, 2026 | 12:39 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले आहे. पक्षात उभी फुट झाली. लवकरच 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील. लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी स्वतंत्र गटाकरिता पत्र देखील दिले. यादरम्यानच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी हैराण करणारा खुलासा केला. ज्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येऊ शकतो. शंभूराज देसाई यांनी म्हटले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आणि खदखद आहे. पक्षातील खासदारांमधील नाराजी ज्याप्रमाणे समोर आली आहे, तशीच परिस्थिती आमदारांचीही आहे. पक्ष नेतृत्वाकडून कोणतेही पाठबळ मिळत नसल्याने उबाठा गटाचे आमदार लवकरच वेगळी भूमिका घेऊ शकतात, असा खळबळजनक दावा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

ऑपरेशन टायगर आणि आमदारांची नाराजी याबाबत विचारले असता शंभूराज देसाई यांनी म्हटले की, उबाठा गटाच्या 6 खासदारांमध्ये असलेली अस्वस्थता त्यांच्या कृतीतून उघड झाली आहे. आमदारांची परिस्थिती तर यापेक्षा वेगळी नाही. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी पक्ष नेतृत्व त्यांना कोणतीही मदत करत नाही. जनतेला काय उत्तर द्यायचे असा प्रश्न या आमदारांना पडला आहे.

त्यामुळे खासदारांप्रमाणेच आमदारांच्या बाबतीतही बंडाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट संकेत शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. शिवसेना वर्धापन दिनानिमित्त त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहेबांचे स्वप्न होते की, राज्याच्या प्रत्येक घराच्या उंबरठ्याआड एक शिवसैनिक असावा. त्यानुसार वाडी, वस्ती आणि वॉर्डावॉर्डात शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज झालो आहोत, 2022 नंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलल्याचे सांगत “गेल्या दोन वर्षांत आमच्या पक्षातील आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी