AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mira Road Murder : सरस्वती मुंबईला नोकरी शोधण्यासाठी आली, मामा भेटल्याचे सांगितलं, अन्…

मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकाडांत प्रकरणात ती राहत असणाऱ्या आश्रमातील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे. सरस्वती वैद्यला आश्रमातून जाऊ दिले जात नव्हते, परंतु मुंबईला नोकरीसाठी जात असल्याचे सांगून ती निघून गेली.

Mira Road Murder : सरस्वती मुंबईला नोकरी शोधण्यासाठी आली, मामा भेटल्याचे सांगितलं, अन्...
saraswati vaidya
| Updated on: Jun 09, 2023 | 4:44 PM
Share

मनोज गाडेकर, अहमदगर : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकाडांत (mira road crime) रोज नवनवे खुलासे होत आहेत. सरस्वती वैद्य हिचा लिव्ह इन पार्टनर मनोज साने याने ही हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. मनोज साने याने चौकशीत गुन्हा कबूल केला असला तरी सरस्वतीची हत्या केली नसल्याचं म्हटलं आहे. त्याच्या दाव्यानुसार 3 जून रोजी सरस्वतीने आत्महत्या केली होती. तुरुंगात जावं लागेल या भीतीमुळे तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे साने याने चौकशीत म्हटले होते. या प्रकरणात सरस्वती ज्या अनाथ आश्रात मोठी झाल्या त्यांनी तिच्यासंदर्भात माहिती दिली आहे.

अहमदनगरमध्ये शिक्षण

मुंबईमधील मिरारोडमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरने तिची निघृण हत्या केली. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावली. ही घटना ज्यावेळी सरस्वती लहानाची मोठी झाली त्या आश्रमाला कळाली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. सरस्वतीचे दहावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगरच्या जानकीबाई आपटे बालिकाश्रम येथील प्राथमिक शाळेत झाले आहे.

नोकरी शोधण्यासाठी गेली

सरस्वती वैद्य ही अनाथ होती. तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना ती अहमदनगरमधील जानकी आपटे अनाथ आश्रम या संस्थेत ती राहत होती. ती नोकरी शोधण्यासाठी मुंबईला गेली. तिला तिचा मामा भेटला, अशी माहिती तिने संस्थेला दिली होती. माझा मामा मुंबई येथे आहे. त्यांनी मला ओळखले आहे. मला त्यांच्याकडे जायचे आहे, असे सांगून ती मुंबईला निघून गेली होती. माझ्या मामाकडे कपड्याच्या मोठमोठ्या मिल असून मी इकडे आनंदात आहे, असे तिने अहमदनगरमध्ये संस्थेमध्ये सांगितले होते.

संस्थेवर केली केस

मुंबईला जाण्यासाठी सरस्वतीला दाखल्याची गरज होती, मात्र दाखला देत नसल्याने तिने या संस्थेवर पाच वेळा केसही केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी ती पुन्हा संस्थेत आली होती, तेव्हा तिची तब्येत अत्यंत खराब दिसली. तिच्या सहकाऱ्यांना लक्षात हे लक्षात आले. याबद्दल संस्थेतील संस्थाचालकांनी, कर्मचाऱ्यांनी सरस्वतीला विचारणाही केली. परंतु तिने काहीही माहिती दिली नव्हती.

सर्वांना बसला धक्का

अचानक सरस्वतीच्या भयानक मृत्यूची घटना संस्थेला कळाली. त्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. सरस्वतीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जानकीबाई आपटे अनाथ बालिकाश्रम संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.