AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिशन महापालिका निवडणूक, एकनाथ शिंदेंची स्पेशल 21 टीम तयार, या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, 21 नेत्यांची टीम बनवण्यात आली आहे.

मिशन महापालिका निवडणूक, एकनाथ शिंदेंची स्पेशल 21 टीम तयार, या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2025 | 6:06 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी आपआपल्या स्थरावर तयारीला सुरुवात केली आहे. राज्यातील निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत, असं अनेकदा महायुतीमधील प्रमुख नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाहीये, त्यातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडल्यानं उत्सुकता आणखी वाढली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर महत्त्वाची बामती समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे. या टीममध्ये  २१ प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 21 शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना  या समितीमध्ये संधी देण्यात आली आहे. शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे असेल.

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती 

१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते २) रामदास कदम, नेते ३) गजानन कीर्तीकर, नेते ४) आनंदराव अडसूळ, नेते ५) मीनाताई कांबळे, नेत्या ६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार ७) रवींद्र वायकर, खासदार ८) मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार ९) राहुल शेवाळे, माजी खासदार १०) संजय निरुपम, माजी खासदार ११) प्रकाश सुर्वे, आमदार १२) अशोक पाटील, आमदार १३) मुरजी पटेल, आमदार १४) दिलीप लांडे, आमदार १५) तुकाराम काते, आमदार १६) मंगेश कुडाळकर, आमदार १७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार १८) सदा सरवणकर, माजी आमदार १९) यामिनी जाधव, माजी आमदार २०) दीपक सावंत, माजी आमदार २१) शिशिर शिंदे, माजी आमदार

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.