Mumbai Municipal Corporation : टनेल लाँड्री निविदा प्रक्रियेची पुनर्तपासणी करून दोषींवर कारवाई करा : आमदार अमित साटम

बॅच वॉशिंग संकल्पनेबाबत यांत्रिकी व विद्युत विभागाने सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर काही सर्वेक्षण केले आहे का ? हे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी संबंधित विभागाने लॉन्ड्री तज्ञांचा सल्ला घेतला आहे का ? बाजार सर्वेक्षण आणि तंत्रज्ञान निष्कर्ष काय आहेत? तसेच कृपया तज्ञ किंवा फर्म नियुक्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली याचा तपशील द्या

Mumbai Municipal Corporation : टनेल लाँड्री निविदा प्रक्रियेची पुनर्तपासणी करून दोषींवर कारवाई करा : आमदार अमित साटम
आमदार अमित साटमImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 5:26 PM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात घोटाळा झाल्याचा संशय भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला होता. तरीही प्रशासनाकडून सारवासारव करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner-Administrator Iqbal Chahal)हे 160 कोटींचे कंत्राट रद्द करावे आणि संपूर्ण निविदा प्रक्रियेची निप:क्षपातीपणे तपासणी करत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदार अमित साटम (BJP MLA Amit Satam) यांनी लेखी पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच आपल्याला प्रमुख अभियंत्याने दिलेले उत्तर हे निव्वळ धूळफेक करणारे आहे. परंतु या पत्राचा सर्व खटाटोप कंत्राटदाराला वाचविण्यासाठीच होता. यामुळे महानगरपालिका प्रशासनाची टक्केवारीसाठी चाललेली केविलवाणी परिस्थिती तसेच अवस्था जनतेसमोर आल्याचेही आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे.

जनतेच्या कराचा पैसा

भाजपा आमदार अमित साटम यांनी महानगरपालिका आयुक्त-प्रशासक इक्बाल चहल यांना लिहिलेल्या पत्रात खळबळजनक आरोप केले आहेत. आमदार श्री. साटम यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आम्ही, टनेल लॉन्ड्री कंत्राटात होत असलेला संशयास्पद तसेच अनेक नियम धाब्यावर बसवून उघड उघड चाललेला भ्रष्ट कारभार आपल्या निदर्शनास आणून दिला होता. परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडून कोणताही थेट प्रतिसाद न मिळता प्रमुख अभियंताच्या मार्फत अत्यंत चालाख आणि सारवासारव करणारं उत्तर मिळाले. हे अतिशय धक्कादायक आहे. जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेच्या कराचा पैसा लागलेला आहे तिथे पारदर्शकतेचा अभाव व नियमांची पायमल्ली होत असेल तर आपल्यावरही कुणाचा तरी राजकीय दबाव आहे का ? अशी शंका येतेय. सदर कंत्राट फक्त टनेल लाँड्री बनविण्यासाठी नसून टक्केवारीसाठी, आपले हात धुवून घेण्यासाठीच काढले आहे का ?

महापालिका आयुक्तांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत

1) बॅच वॉशिंग संकल्पनेबाबत यांत्रिकी व विद्युत विभागाने सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर काही सर्वेक्षण केले आहे का ? हे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी संबंधित विभागाने लॉन्ड्री तज्ञांचा सल्ला घेतला आहे का ? बाजार सर्वेक्षण आणि तंत्रज्ञान निष्कर्ष काय आहेत? तसेच कृपया तज्ञ किंवा फर्म नियुक्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली याचा तपशील द्या.

हे सुद्धा वाचा

2) आम्हांला प्राप्त झालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेचे एक माजी वरिष्ठ अधिकारी या निविदेमध्ये टनेल लॉन्ड्री संदर्भातील टेक्निकल एक्सपर्ट म्हणून कंत्राटद्वाराला साह्य करत आहेत. महानगरपालिकेमधील सेवेमध्ये असताना त्या अधिकाऱ्याला या निवेदेमधील सर्व बारकावे माहिती होते आणि त्या सर्व गोपनीय माहितीचा वापर आणि फायदा आता ते पूर्णपणे संबंधित कंत्राटदाराला करून देत आहेत.

3) निविदेत दिलेल्या तांत्रिक वैशिष्ट्यांना (Technical Specifications)अंतिम रूप देण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या टनेल लॉन्ड्री (Tunnel Laundry) उत्पादन कंपनीच्या तांत्रिक वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला ? कृपया यासंबंधी विभागाद्वारे केलेल्या उत्पादन / बोली लावणाऱ्या कंपन्यांना केलेले सर्व संप्रेषण (communication)द्यावे.

4) संबंधित निविदेचा अंतिम अंदाज (Financial Estimate)कसा काढला गेला? कृपया निविदेत नमूद केलेल्या कामासाठी निविदेचा अंतिम अंदाज तयार करण्यासाठी विचारात घेतलेल्या अंदाजपत्रकीय ऑफरचा तपशील द्या.

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.