‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, पवारांच्या वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना काढलेल्या चिमट्यानंतर आमदार अतुल भातळकर यांनी सेनेला डिवचलं आहे. बरं झालं सोनाराने कान टोचले, असं ट्विट भातखळकर यांनी केलंय.

'सोनाराने कान टोचले ते बरेच झाले', पवारांच्या वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 7:50 PM

मुंबई : ‘शिवसेनेचा भगवा फडकवा, हे भाषण 30 वर्षांपासून ऐकत आहे’, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, असं खोचक ट्विट केलंय . (MLA Atul Bhatkhalkar taunt Shivsena over Sharad Pawar Statement on Uddhav thackeray)

महाराष्ट्रावर शिवसेनाचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. शरद पवारांना यावरच प्रतिक्रिया विचारली असता, ‘हे भाषण मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतो आहे’, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.

शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना काढलेल्या चिमट्यानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी सेनेला डिवचलं आहे. पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर हा घ्या घरचा आहेर, ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, असं ट्विट भातखळकरांनी केलं आहे.

शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरु झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवार यांनी सेनेला काढलेल्या चिमट्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी ट्विट करत सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

(MLA Atul Bhatkhalkar taunt Shivsena over Sharad Pawar Statement on Uddhav thackeray)

संबंधित बातम्या

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार

शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.