शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी ऑनलाईन बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले.

शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

मुंबई : महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत काल रात्री उशिरा पार पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक तब्बल तीन तास चालली. (CM Uddhav Thackeray Video Conference important meeting with Shivsena district leaders)

दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरु झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली.

यंदा कोव्हिडच्या काळात राज्य सरकारकडे निधीची कमतरता असली तरी पुढच्या वर्षी जिल्ह्यांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिले.

कोव्हिडच्या काळात सरकार आपलं काम करत आहे, पण पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना केल्या. टीकाकारांना टीका करु द्या, तुम्ही तुमचे काम करत राहा असा सल्लाही ठाकरेंनी या संवादात दिल्याचे कळते.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा घणाघात

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी घणाघाती भाषण केलं होतं. या भाषणातून त्यांनी भाजपवर हल्ला चढवला होताच, मात्र त्याशिवाय त्यांनी शिवसेनेचे कट्टर शत्रू असलेले भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा चढवला होता.

राज्यपालनियुक्त आमदारांच्या नावाबाबत चर्चा शक्य

विधानपरिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना लवकरच मुहूर्त लागण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे. (CM Uddhav Thackeray Video Conference important meeting with Shivsena district leaders)

संबंधित बातम्या:

घणाघाती भाषणानंतर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली

जीएसटी फसल्याचं मान्य करून रद्द करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडाडले

इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे

(CM Uddhav Thackeray Video Conference important meeting with Shivsena district leaders)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *