मोठी बातमी! पुण्याचा विद्यार्थी मोर्चा मुंबईत धडकणार? रोहित पवारांची मोठी भूमिका, विद्यार्थी म्हणाले…

पुण्यामध्ये रोहित पवार यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मुंबईच्या दिशेने निघायचं का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सहमती दर्शवली आहे.

मोठी बातमी! पुण्याचा विद्यार्थी मोर्चा मुंबईत धडकणार? रोहित पवारांची मोठी भूमिका, विद्यार्थी म्हणाले...
rohit pawar news
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 11:09 PM

दीपक कापरे, पुणे टीव्ही9 मराठी प्रतिनिधी: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मुंबईच्या दिशेने निघण्याची शक्यता… रोहित पवार यांनी केली विद्यार्थ्यांना विचारणा. गेल्या सहा दिवसापासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसल्याने आज रोहित पवार यांनी भर सभेत विद्यार्थ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी करावी असे सांगितले. यावेळी एमपीएससी विद्यार्थिनी हात वर करून तयारी दर्शवली… त्यामुळे येत्या काही दिवसात पुण्यातील एमपीएससीचा आंदोलन मुंबईच्या दिशेने निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आंदोल करत आहेत. यावेळी त्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण खूप दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला काही यश मिळालं नाही. राजीनाम्याची मागणी पूर्ण होत नसल्याने आता आमदार रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना थेट मोर्चा मुंबईला हलवण्याचा विचार केला.

Loading...

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी आमदार रोहित पवारांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रोहित पवारांनी विचारलं की, आपल्या मागण्यांना यश मिळत नाही तर आपण मुंबईला जायचं का? त्यावर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आला. सर्व विद्यार्थ्यांनी संमती दर्शवली.  त्यामुळे आता या आंदोलनावरुन आणखी वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थी आणि आमदार रोहित पवार हे गेली अनेक दिवस या ठिकाणी आंदोलन करत आहेत.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार भाषणाला सुरूवात. मंत्री येतायेत फक्त बसतात. तुमच्यासाठी उपोषण करतात. मला फार वाईट वाटलं दिल्लीतसुध्दा आंदोलकांवर कारवाई सुरु आहे. पवार साहेब हे आपलं ब्रम्हास्त्र आहे. ते शेवटी आपण वापरणार आहोत. सगळे नेते येथे आले त्य़ांचे आभार. उद्या तुम्ही 10 च्या आत येथे या. आज नाही तर कधीच नाही. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो आपण मुंबईला निघायचं का ? विद्यार्थ्यांची सर्वांच्या विनंती एकाचं उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणा करून निर्दयी आहे. आपल्याला हा त्रास सरकारला द्यायचा आहे रक्तातील साखर कमी होणं योग्य नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us