मोठी बातमी! रोहित पवार यांच्याकडून थेट भाजपाच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी, पुण्यातील एमपीएससी आंदोलनात..

पुण्यात रोहित पवार यांचे आंदोलन सुरू आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत आमदार रोहित पवार आंदोलनाला बसले आहेत. आज या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. यादरम्यानच रोहित पवार यांनी भाजपाच्या मंंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मोठी बातमी! रोहित पवार यांच्याकडून थेट भाजपाच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी, पुण्यातील एमपीएससी आंदोलनात..
Rohit Pawar
| Updated on: Oct 07, 2026 | 12:33 PM

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी रोहित पवार आंदोलनाला बसले आहेत. गेल्या सात दिवसांपासून ते विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले आहेत. त्यातच काही याचिकाकर्ते या आंदोलनाविरोधात कोर्टात गेले. ज्यानंतर कोर्टाने काही महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. आता रोहित पवार आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यानेच हायकोर्टात याचिका दाखल केल्याचे त्यांनी म्हटले. हेच नाही तर भाजपाकडूनच हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोठे विधान रोहित पवार यांनी केले. आता थेट अतूल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी रोहित पवार यांनी केली. या प्रकरणात पुढील सुनावणी आता 25 नोव्हेंबर आहे. आंदोलन मागे घेतो असे बोलले होते पण ते त्यांनी घेतले नसल्याचा मोठा दावा कोर्टात सरकारी वकिलांनी केला.

पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर आहे आणि ती तशीच राहू द्या, असे मोठे विधान कोर्टाने केले. पुण्याला आंदोलनाचे केंद्र बनू देऊ नका, असेही कोर्टाने नमूद केले. आपआपल्या क्लासमध्ये जा असेही कोर्टाने म्हटले. यासोबतच विद्यार्थ्यांना मोठी विनंती कोर्टाने करत आपआपल्या संस्थांमध्ये परत जा असेही कोर्टाने म्हटले. यावेळी रोहित पवार यांनी थेट आव्हान दिले. रोहित पवार यांनी म्हटले की, हिंमत असेल तर आमच्या एकाही विद्यार्थ्याच्या केसाला हात लावून द्या.

Loading...

पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, सरकारला सांगा मित्राची बाजू घेऊ नका. सरकारला फक्त मित्राची बाजू घ्यायची. अध्यक्षांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. तो याचिकाकर्ता कोणाचा कार्यकर्ता आहे हे मला माहिती आहे. या गरीब लोकांसाठी कोण लढणार. आमच्याकडे इथे मंत्री येत नाहीत. मंत्री दुसरीकडे येतात. आमच्या आंदोलनाला 7 दिवस झाले आणि आज महाज्योतीच्या परीक्षेत घोटाळा झाला.

तुम्ही विद्यार्थ्यांसोबत प्रेमाने बोला. सरकारशी नाही. या अध्यक्षाला घरी पाठवले पाहिजे. कोर्ट एमपीएससीच्या विषयात काहीच करू शकत नाही. जर करू शकते तर सुप्रीम कोर्ट करू शकते. एमपीएससीच्या अध्यक्षाला कोर्ट घरी पाठू शकत नाही. आमची सर्वात मोठी मागणी अध्यक्षांना घरी पाठवा ही आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us