AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या आमदाराला आणण्यासाठी शिंदेंनी पाठवलं हेलिकॉप्टर, त्याचीच भरसभेत पत्रकारांना धमकी, म्हणाला बघून घेतो…

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, आमदार शरद सोनवणे यांनी भरसभेत पत्रकारांना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. मी पाहतोच एकदा, माझ्यावर खूप कलमे आहेत पहिल्यापासून असं सोनवणे यांनी म्हटलं आहे.

ज्या आमदाराला आणण्यासाठी शिंदेंनी पाठवलं हेलिकॉप्टर, त्याचीच भरसभेत पत्रकारांना धमकी, म्हणाला बघून घेतो...
Sharad SonawaneImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 3:26 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी भरसभेत पत्रकारांना धमकीवजा इशारा  दिला आहे.  आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.  पत्रकारांनी धंदा मांडून ठेवला आहे, हे सर्व जण धंदेखोर झाले आहेत, असे म्हणत त्यांनी पत्रकार वाणी यांचे नाव घेत धमकी दिली आहे.  “15 ऑगस्ट होऊ द्या, नंतर मी आणि ते आहेच. मी पाहतोच एकदा. माझ्यावर खूप कलमे आहेत पहिल्यापासून. मी तुमच्याकडे पाहणार,” असं वक्तव्य आमदार सोनवणे यांनी केले आहे. त्यामुळे आता आमदार शरद सोनवणे हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले सोनवणे? 

आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.  पत्रकारांनी धंदा मांडून ठेवला आहे, हे सर्व जण धंदेखोर झाले आहेत, असे म्हणत त्यांनी पत्रकार वाणी यांचे नाव घेत धमकी दिली आहे. “15 ऑगस्ट होऊ द्या, नंतर मी आणि ते आहेच. मी पाहतोच एकदा. माझ्यावर खूप कलमे आहेत पहिल्यापासून. मी तुमच्याकडे पाहणार,” असं वक्तव्य आमदार सोनवणे यांनी केले आहे. त्यामुळे आमदार शरद सोनवणे आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत.  तुम्ही नागरिक असाल तर ते तुमच्या घरी, ‘तुम्ही आमची वाट लावता’ अशा शब्दात शरद सोनवणे यांनी सुरेश वाणी यांना भरसभेत धमकी दिली आहे.

कोण आहेत शरद सोनवणे? 

शरद सोनवणे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार आहेत. ते 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जॉइंट किलर ठरले होते. सोनवणे यांचा जवळपास सात हजार मतांनी विजय झाला, दरम्यान अपक्ष असूनही विजय झाला म्हणून त्यानंतर सोनवणे यांना आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांचं गाव असलेल्या राजुरीमध्ये थेट हेलिकॉप्टर पाठवलं होतं, याच हेलिकॉप्टरमध्ये बसून शरद सोनवणे हे मुंबईला आले होते. त्यावेळी याची प्रचंड चर्चा झाली होती, आता पुन्हा एकदा सोनवणे चर्चेत आले आहेत.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप