Marathi Language Row : तुम्ही कोणाला चॅलेंज करताय, आमच्या अंगावर आलात तर कन्फर्म..अमित ठाकरेंची वॉर्निंग

Marathi Language Row : "लोकांनी हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे, कश्या प्रकारचं सरकारच काम चालू आहे. 15 वर्ष तुम्हाला दिली तुम्ही काय करून ठेवलं. लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. लोकं रस्त्यावर उतरली सरकारला जाब विचारायला लागली तर हे घरीच बसणार आहेत"

Marathi Language Row : तुम्ही कोणाला चॅलेंज करताय, आमच्या अंगावर आलात तर कन्फर्म..अमित ठाकरेंची वॉर्निंग
Amit Thackeray
| Updated on: Aug 29, 2026 | 7:19 AM

खारघरमध्ये एका झेरॉक्स दुकानात हजारो SIR फॉर्म सापडले त्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. या SIR फॉर्मची झेरॉक्स काढण्याचं काम सुरु होतं. भाजपच्या एक युवा पदाधिकाऱ्यावर हे फॉर्म झेरॉक्ससाठी आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चार बीएलओंना निलंबित करण्यात आलं आहे. पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या SIR फॉर्मची झेरॉक्स काढली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानात धाव घेतली. त्यावेळी तिथे राडा झाला. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पश्चिम बंगाल मध्ये जे झालं तेच वाटतय. भाजपचे मतदार ठेवायचेत आणि इतर मतदार काढून टाकायचे आहेत. शासनाकडून यांना form दिले कोणी?. हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. हे जे चालू आहे ते खूप चुकीचं चालू आहे. दडपशाहीच्या मार्गावर आपण चाललो आहोत. हे आपल्या समोर आले. असे किती प्रकार चालू असतील आपल्याला माहित नाही” असं अमित ठाकरे म्हणाले.

“लोकांनी हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे, कश्या प्रकारचं सरकारच काम चालू आहे. 15 वर्ष तुम्हाला दिली तुम्ही काय करून ठेवलं. लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. लोकं रस्त्यावर उतरली सरकारला जाब विचारायला लागली तर हे घरीच बसणार आहेत” असं अमित ठाकरे म्हणाले. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभरासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्यावर अमित ठाकरे म्हणाले की, “मुदतवाढ UP च्या इलेकशन साठी दिलीय. नागरिक मराठी बोलत असतील आणि समोरचा रिक्षा वाला दादागिरी करत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे. ही जी मगृरी आहे आम्ही शिकणार नाही, तुम्हाला जे उखाडायचं ते उखाडा तुम्ही कोणाला चॅलेंज करत आहात”

सत्तेसाठी किती लाचार होणार आहोत आपण

“एका वेगळ्या राज्यांची निवडणूक येणार आहे म्हणून आपले सरकार किती लाचार होणार आहे. आपली भाषा आपली संस्कृती बाजूला ठेवलीय. आपलं राज्य बाजूला ठेवलय आणि तुम्ही त्यांच्या भाषेसाठी लढताय का, कारण त्यांची निवडणूक आहे. सत्तेसाठी किती लाचार होणार आहोत आपण” अशा शब्दात अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केला. “जे मराठी शिकतायत आम्ही त्यांच्या विरोधात नाही. तुम्ही आमच्या अंगावर नका येऊ. आम्ही मराठीतच बोलणार आमच्या अंगावर आलात कन्फर्म मार खाणार” असं अमित ठाकरे म्हणाले.

Follow Us