राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग, पुर्वनियोजित भेट..
राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अचानक सकाळी त्यांचा ताफा वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाला. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजपावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

प्रतिनिधी विनायक डावरूंग : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता राज ठाकरे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजपावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यांनी राज्यातील बड्या नेत्यांवरही टीका केली. पण आज सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्यापासून सरकार राज ठाकरेंची टीका वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच मेळाव्यात देखील त्यांनी नरेंद्र मोदींंसह अमित शाह यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या जिमखान्याच्या मुद्द्यात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्या कळतंय.
राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक देखील सोबत आहेत. 8 वाजता राज ठाकरे वर्षा बंगल्यावर पोहोचले. अचानकपणे राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. यादरम्यानच मुंबई गोवा महामार्गाची पाहणी राज ठाकरे यांनी केली होती. ते स्वत: या महामार्गाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते.
आता मुंबई गोवा महामार्गावरही ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करू शकतात. जेंनजीच्या आंदोलनातही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताना राज ठाकरे दिसले होते. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मोठ्या उत्साहाचे आयोजन करण्यात आले. नितीन गडकरी यांच्यावरही टीका करताना राज ठाकरे दिसत आहेत. त्यातच ते आता थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून सतत भाजपावर टीका केली जात आहे.
मात्र, त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले नाहीत. राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या जिमखान्याच्या मुद्द्यात राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचे सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर राज ठाकरे नक्की काय भाष्य करतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट पुर्वनियोजित होती. दोन दिवसांपूर्वीच ही भेट ठरली होती. त्यानुसार, आज सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.