AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता दुसऱ्या ठाकरेंना मोठा झटका… मनसेला खिंडार! बड्या नेत्यापाठोपाठ 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; रायगडमध्ये मोठी फूट

Raj Thackeray MNS : राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे. रायगड मनसेमधील जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर आता तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

आता दुसऱ्या ठाकरेंना मोठा झटका... मनसेला खिंडार! बड्या नेत्यापाठोपाठ 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; रायगडमध्ये मोठी फूट
MNS 55 Members Resign in RaigadImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 23, 2026 | 2:37 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. अशातच आता राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे. रायगड मनसेमधील जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर सुरू झालेले नाराजी नाट्य आता मोठ्या राजकीय घडामोडीत रूपांतरित झाले आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनीही पक्षपदांचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.

55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संदीप ठाकूर यांना डावलून मनसेने रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पक्षात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही सोशल मीडियावरून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. एका बाजूला संदीप ठाकूर यांचा राजीनामा आणि दुसऱ्या बाजूला 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे यामुळे रायगड मनसेमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संदीप ठाकूर यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र TV9 मराठीशी बोलताना त्यावेळेस संदीप ठाकूर यांनी ही केवळ कौटुंबिक भेट असल्याचे स्पष्ट केले होते या भेटीचा राजकारणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले संदीप ठाकूर?

संदीप ठाकूर यांना तुमची पुढील राजकीय वाटचाल काय असणार आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ठाकूर यांनी म्हटले की, कुणासोबत काम करावं याबाबत मी महिनाभर विचारमंथन केलेलं आहे. आम्ही लोकांमध्ये राहून लोकांसाठी आणि लोकहितार्थ काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व जर आम्हाला संधी देत असेल तर आम्ही विचार करू. मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून याबाबत निर्णय घेणार आहे

दरम्यान, एका बाजूला संदीप ठाकूर यांचा राजीनामा आणि दुसऱ्या बाजूला 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे यामुळे रायगड मनसेमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रायगड मनसेतील हे नाराजी नाट्य आता कोणते राजकीय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!