AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवर राज ठाकरेंचा संताप

पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला असून ५१ जण जखमी झाले आहेत. राज ठाकरे यांनी या दुर्घटनेवरून सरकारवर टीका केली आहे आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवर राज ठाकरेंचा संताप
Raj thackeray kundmala bridge collapse
| Updated on: Jun 16, 2025 | 10:24 AM
Share

पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 51 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत अद्याप कोणताही पर्यटक बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही. पण तरीही खबरदारी म्हणून आज सकाळपासूनच पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आता या दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला सुनावले आहे.

राज ठाकरे यांनी नुकतंच ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी कुंडमळ्यातील तुटलेल्या पुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’ पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग?

पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं.

आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं, असे राज ठाकरेंनी म्हटले.

पावसामुळे बचावकार्यात अडचणी

दरम्यान पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ५१ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल दुपारपासून रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे साडेसहा तास चाललेल्या पहिल्या टप्प्यातील बचावकार्यात चार मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. रात्री १० वाजता थांबवण्यात आलेले बचावकार्य आज सकाळी ७ वाजता पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.