AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजित पवारांनी भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून…” अमित ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थावर एक बैठक घेतली, ज्यामध्ये आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. पक्षवाढीवर भर देण्यात आला असून, दिल्लीच्या निवडणुकीच्या निकालांवरही चर्चा झाली.

अजित पवारांनी भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून... अमित ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
raj thackeray ajit pawar
| Updated on: Feb 09, 2025 | 3:38 PM
Share

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानतंर आता सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकला चलो रे चा नारा दिला होता. त्यानंतर भाजपनेही महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिका निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतंच एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षवाढीबद्दल पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी शिवतीर्थावर बैठक बोलवली होती. या बैठकीत मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीबद्दल महत्त्वाच्या सूचना दिल्या. या बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमची पक्षवाढीसाठी बैठक झाली. यावेळी संघटनात्मक पातळीवर चर्चा झाली, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

निकालावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या

“दिल्लीची परिस्थिती ही वेगळी आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे निकाल लागले आणि सहा महिन्यांनी हे निकाल बदलले गेले. त्याच्यावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक संस्थांकडूनही यावर शंका उपस्थित करण्यात आली आहे. यात पारदर्शकता आली पाहिजे, असे मला वाटते”, असे संदीप देशपांडे म्हणाले.

“विरोधकांमध्ये एकी नसल्याने त्याचा परिणाम हा दिल्लीच्या निकालावर दिसला. आप आणि काँग्रेस जर एकत्र लढले असते तर कदाचित दिल्लीचे चित्र थोडे वेगळे दिसलं असतं”, असे संदीप देशपांडेंनी म्हटले.

“भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून मतं मिळाली”

“अजित पवारांचाही मुलगा निवडून आला नव्हता. पवार साहेबांच्या पत्नीदेखील निवडून आल्या नव्हत्या. आम्ही जी काही निवडणूक लढवली आणि आम्हाला जी काही मत मिळाली ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपचा पदर पकडला किंवा मोदींचे नाव घेतले म्हणून आम्हाला ही मत मिळालेली नाहीत. अजित पवारांना जी मत मिळाली आहेत, ती भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून ती मिळाले. त्यांनी एकट्याच्या जीवावर उभं राहवं आणि मग या वल्गना कराव्यात”, असा टोलाही संदीप देशपांडेंनी लगावला.

Follow Us
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी