
राज्यातील जवळपास सर्वच महापालिका निवडणुकांचे निकाल आता हाती आले आहेत. राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या निकालाची पुनरावृत्ती झाल्याचं पहायला मिळत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं होतं. हेच यश महापालिका निवडणुकीमध्ये देखील भाजपनं कायम ठेवलं आहे. राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाचे उमेदवार तब्बल 1421 जागांवर आघाडीवर आहेत, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकांपैकी 25 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे.
दरम्यान या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं राज्यात पहिल्यांदाच एक नवा प्रयोग पहायला मिळाला. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 64 उमेदवार विजयी झाले आहेत, तर मनसेचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीचे मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 72 उमेदवार विजयी झाले आहेत.
Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...
BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...
BMC Election Result 2026 : आकडे खाली-वर होत होते, आता मुंबईत स्थिती काय?
बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
मनसेच्या विजयी उमेदवारांची नावं
मुंबई प्रभाग क्रमांक 38 – सुरेखा परब
मुंबई प्रभाग क्रमांक74 – विद्या आर्या
मुंबई प्रभाग क्रमांक 128 – सई शिर्के
मुंबई प्रभाग क्रमांक 205- सुप्रिया दळवी
मुंबई प्रभाग क्रमांक 110 हरी नाक्षी चिराथ
मुंबई प्रभाग क्रमांक 115 – ज्योती राजभोज
आतापर्यंत या मनसेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
मुंबईत आकड्यांचा खेळ बिघडणार?
दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये सकाळपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळेल असं चित्र होतं. परंतु आता निकालामध्ये उलटफेर पहायला मिळत आहे, मुंबईत भाजपचं संख्याबळ घटताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार मुंबईमध्ये भाजप 84 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट 27 जागांवर आघाडीवर आहे. मात्र अजूनही पूर्ण स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालेलं नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून काँग्रेसचे 23 उमेदवार आघाडीवर आहेत, त्यामुळे काँग्रेस किंगमेकरची भूमिका बजावणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.