कल्याण स्टेशनवर मोठा राडा; मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोपला
कल्याण रेल्वे स्टेशनवर मोठा राडा झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोप दिला आहे. या मारहाणीनंतर जीआरपी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

सुनील जाधव, प्रतिनिधी : कल्याणमधून मोठी बातमी हाती आली आहे. कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठा राडा झाला आहे. कल्याण रेल्वे स्थानकात मनसे पदाधिकाऱ्याला स्टेशन मास्तरला चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला पॉइंट्समनसोबत गैरवर्तनाचा आरोप करत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोप दिला. स्टेशन मास्तरला चोप दिल्याने त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. स्टेशन मास्तरला चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या महिला पॉईंट्समनसोबत गैरवर्तनाचा आरोप स्टेशन मास्तरावर होता. त्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोप दिला. डीवाय स्टेशन मास्तरकडून सहा महिन्यांपासून त्रास दिल्याचा महिलेचा आरोप आहे. या स्टेशन मास्तरने घरी येण्यास सांगत अश्लील भाषेत बोलल्याचा आरोप महिलेचा होता. या महिलेने मनसे पदाधिकाऱ्यांकडे स्टेशन मास्तरची तक्रार केली होती. हा प्रकार उघडकीस येताच मनसे रेल्वे कामगार सेना पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी डीवाय स्टेशन मास्तर आशुतोष कुमार यांना पदाधिकाऱ्यांनी मारहाण करत चोप दिला. त्यानंतर कल्याण जीआरपीने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आता या प्रकरणात डिवाय स्टेशन मास्तवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.
डोंबिवलीत भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण
डोंबिवलीत भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण करून फाशी देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सागर्ली येथील सुरेश कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडल्याची तक्रार करण्यात आलीये.. कुत्र्याला बॅटने मारहाण करण्यात आली. त्यानंतर वॉचमनने कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून फाशी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, प्राणीमित्र हिर मंजीतसिंग राजपूत यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी दोन रहिवासी आणि वॉचमनविरोधात गुन्हा दाखल केलाय. सोसायटीमधील तिघांनी कुत्र्याला अमानुषपणे मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकणात नागरिकांकडून तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.