AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणून मी वडिलांना एकटं सोडत नाही….आदित्य ठाकरेंसमोर पाचवीच्या मोहम्मद अल्ताफने सांगितले वडिलांसोबत फिरण्याचे कारण..

शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर होते. तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे त्यांनी आज शेतीची पाहणी केली.यावेळी एका शेतकऱ्याच्या मुलाने आदित्य ठाकरे यांच्याकडे आपली व्यथा मांडली.

म्हणून मी वडिलांना एकटं सोडत नाही....आदित्य ठाकरेंसमोर पाचवीच्या मोहम्मद अल्ताफने सांगितले वडिलांसोबत फिरण्याचे कारण..
aditya thackeray news
| Updated on: Sep 26, 2026 | 6:23 PM
Share

श्रीराम क्षीरसागर, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव येथील तुळजापूर तालुक्यातील शेतकरी अल्ताफ बेग हे दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक संकटाने खचले आहेत. आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून त्यांचा पाचवी शिकणारा मुलगा शाळेत जाण्याऐवजी वडिलांसोबत फिरत आहे. वडील एकटे असताना काहीतरी करुन घेतील म्हणून आपण त्यांना एकटं सोडत नाही अशी व्यथा अल्ताफ बेग यांच्या कोवळ्या मुलाने धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे.

तुळजापूर तालुक्यातील शेतकरी अल्ताफ बेग दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक संकटामुळे अत्यंत खचले आहेत. आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून त्यांचा पाचवीत शिकणारा मुलाने शाळा सोडली आहे. तो म्हणतो, ‘आपण कायम वडिलांसोबत रहातो. वडील एकटे असताना काहीतरी करून घेतील, अशी भीती आपल्याला वाटते… म्हणून आपण त्यांना एकटं सोडत नाही’, अशी भिती अल्ताफ यांच्या पाचवीतील मुलाने व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासमोर अल्ताफ बेग याने ही भीती व्यक्त केली.

दुष्काळाने शेतीचं उत्पन्न गेलं, घरची परिस्थिती बिकट झाली आणि साधं पेट्रोल टाकण्यासाठीही पैसे नसल्याने शेतातील लोखंड गोळा करून विकण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचं अल्ताफ बेग यांनी सांगितलं.एकीकडे हातात काम नाही, शेतीत उत्पन्न नाही आणि दुसरीकडे कर्ज-खर्चाचा बोजा वाढला आहे. या परिस्थितीत एका शेतकऱ्याच्या जगण्याचा संघर्ष आणि त्याच्या मुलाचं हरवलेलं बालपण आज समोर आले आहे.पाचवीच्या मुलाच्या हातात दप्तर असायला हवं होतं. मात्र दुष्काळात वडिलांच्या काळजीने त्याला शाळा सोडावी लागली.अल्ताफ बेग यांची व्यथा ऐकताना आदित्य ठाकरे यांच्यासह उपस्थितांच्याही काळजात कालवाकालव झाली. दुष्काळ केवळ शेतातील पीक जाळत नाही, तर शेतकरी कुटुंबांच्या स्वप्नांवरही संकट आणतो, याचं हे हृदयस्पर्शी उदाहरण म्हटले जात आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!