AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशवंत जाधवप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा; mohit kamboj यांची मागणी

शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केली आहे.

यशवंत जाधवप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा; mohit kamboj यांची मागणी
यशवंत जाधवप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा; mohit kamboj यांची मागणीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 11:07 AM
Share

योगेश पाटील, मुंबई: शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (iqbal singh chahal) यांची आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांनी केली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी अमेरिकेत मालमत्ता खरेदी केली असून त्याबाबतची माहिती येत्या आठवडाभरात आयकर विभाला देणार असल्याचा गौप्यस्फोटही कंबोज यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभाग केवळ नेत्यांचीच चौकशी का करते? नोकरशहांची चौकशी का करत नाही? महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला. यशवंत जाधव यांनी अल्पावधीत प्रचंड माया जमा केली. आयुक्तांच्या आशीर्वादाशिवाय ते ही माया जमा करू शकतात का? असा सवाल करतानाच आयुक्त लोकांना नोटीस पाठवतात. मग स्वत: चौकशीला का सामोरे जात नाहीत? असा सवालही कंबोज यांनी केला आहे.

मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात महापालिका आयुक्तांना आयकर विभागाने नोटीस पाठवली नाही. स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या भ्रष्टाचारावर नोटीस दिली नाही. यशवंत जाधव यांची 22 महिन्यात 36 मालमत्ता बनवल्या. 360 कोटींचा घोटाळा त्यांनी केला. स्थायी समितीत जेवढे प्रस्ताव जातात. त्याचा अजेंडा आयुक्त लावतात. स्थायी समितीचा अजेंडा सेट करण्याचं काम आयुक्ताचं आहे. त्यामुळे जाधव यांनी केलेल्या भ्रष्टाचारात आयुक्तांना किती कट मिळाला? त्याची चौकशी का केली नाही? त्यांना चौकशीच्या फेऱ्यात का घेतलं नाही? त्यांच्या परवानगी शिवाय भ्रष्टाचार होऊच शकत नाही, असं कंबोज म्हणाले.

आयुक्तांची अमेरिकेत संपत्ती

जाधवांच्या भ्रष्टाचारात आयुक्तांचा किती रोल हा प्रश्न निर्माण झाला आहे. जाधवांच्या मालमत्तांची चौकशी सुरू आहे. इक्बाल सिंग यांनी अमेरिकेत संपत्ती घेतली आहे. येत्या काळात आयकर विभागाला त्याची माहिती देणार आहे. पटेलपासून फिल्मस्टारपर्यंतचं वसुलीचं रॅकॅटे सुरू होतं. त्याची माहिती आम्ही देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

पालिकेच्या भ्रष्टाचारावर पुस्तक

ब्लॅकलिस्ट कंपन्यांना कोविडचं काम दिलं गेलं. इतका गंभीर भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला. त्याला लोवर लेव्हल म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रकार झाला. त्यावरून यात दाल में कुछ काला है असं वाटतं. या भ्रष्टाचारात लोकांना फेव्हर केलं गेलं. त्याची चौकशी होत असेल तर इक्बाल सिंग का घाबरत आहे? भाजपचे आमदार अमित साटम यांनी त्यावर सातत्याने आवाज उठवला आहे. ‘बीएमसी’ नावाचं पुस्तक अमित साटम प्रकाशित करत आहे. मुंबई महापालिकेने गेल्या दोन वर्षात कसा भ्रष्टाचार केला त्याची माहिती या पुस्तकात देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष NANA PATOLE यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, महात्मा बसवेश्वरांच्या स्मारक समितीची नव्याने स्थापना करण्याची मागणी

Cotton Crop : पुन्हा पांढऱ्या सोन्याने बहरणार शिवार, घटलेले क्षेत्र कशामुळे वाढणार?

Maharashtra News Live Update : पुणे मुंबई हायवेवर लोणावळ्याजवळ वाहतूक कोंडी

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.