AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : कोकणापासून मराठवाड्यापर्यंत धो-धो कोसळणार, देशाच्या या भागाला IMD कडून अलर्ट जारी

India Rain Update : उद्या देशातील विविध भागांमध्ये हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच देशाच्या इतर भागातही पावसाची शक्यता आहे.

Monsoon Update : कोकणापासून मराठवाड्यापर्यंत धो-धो कोसळणार, देशाच्या या भागाला IMD कडून अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert for 22 juneImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 21, 2026 | 5:28 PM
Share

देशाच्या विविध भागात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. काही भागात प्रखर ऊन आणि उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहेत. उद्या देशातील विविध भागांमध्ये हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राजधानी बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, बंगाल, दक्षिण भारतातही हवामानात बदल जाणवणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मान्सूनबाबत ताजी अपडेट

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी कोकण आणि गोवा परिसरात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशातील आणखी काही भागांत पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. 23 जूनपर्यंत महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात 25 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

बिहार

बिहारमध्ये मान्सूनचा वेग वाढत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहील आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. उत्तर बिहारमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागांत मान्सूनची सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागांत दाट ढग आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या किनारी भागांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील, ज्यामुळे दमट उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल आणि सिक्कीम

उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. उद्या या भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे डोंगराळ भागांत भूस्खलनाचा धोका वाढला आहे. पश्चिम बंगालमध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

आसाम आणि मेघालय

ईशान्येतील या दोन्ही राज्यांमध्ये उद्या मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय राहणार आहे. हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आकाश पूर्णपणे काळ्या ढगांनी झाकलेले असेल त्यामुळे दिवसा देखील अंधार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबाद परिसरात उद्या अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि उंचावरील भागांत गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ओडिशा

ओडिशामध्ये उद्याचे हवामान दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागांत गरम आणि दमट वातावरण राहील. मात्र दुपारनंतर किंवा सायंकाळी काही अंतर्गत आणि किनारी भागांत मेघगर्जनेसह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि हलका पाऊस पडू शकतो.

तेलंगणा

तेलंगणामध्ये पुढील 24 तासांत हवामानात मोठे चढ-उतार दिसू शकतात. काही भागांत उष्णतेची लाट कायम राहील, तर दुसरीकडे मेघगर्जनेसह वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात उद्या दोन प्रकारचे हवामान अनुभवायला मिळेल. पूर्व उत्तर प्रदेशात कडक उन्हासह उष्णतेची लाट कायम राहील. तर पश्चिम उत्तर प्रदेशात अंशतः ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील कमाल तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेश

पूर्व मध्य प्रदेशात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असून उद्या देखील प्रखर ऊन आणि उकाडा जाणवेल. तर पश्चिम मध्य प्रदेशात धुळीची वादळे, ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

राजस्थान

राजस्थानमध्ये हवामान विभागाने 22 जूनसाठी थंडरस्क्वॉलचा इशारा दिला आहे. यामुळे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने धुळीची तीव्र वादळे येण्याची शक्यता आहे, तसेच काही भागात पावसाची शक्यता आहे.

Follow Us
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप