AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोशी कचरा डेपो दुर्घटना : एक महिना आधी पतीला गमावलं, आता पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल

पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो जवळील इमारत दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरत नसतानाच, पत्नी सोनाली गायकवाड यांनी पतीच्या वियोगाने आत्महत्या करत जीवन संपवले. या हृदयद्रावक घटनेने त्यांच्या दोन लहान मुली पोरक्या झाल्या असून गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मोशी कचरा डेपो दुर्घटना : एक महिना आधी पतीला गमावलं, आता पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल
मोशी कचरा डेपो दुर्घटना
| Updated on: Aug 13, 2026 | 12:56 PM
Share

गेल्या महिन्यात मोशी कचरा डेपोजवळ एक मोठी इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला, तिथे काम करणारे अनेक जण त्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. दोन तीन दिवस अथक बचावकार्य सुरू होतं, ढिगाऱ्याखालून अनेक लोकांना बाहेर काढलं खरं मात्र त्यातच काहींचा मृत्यूही झाला. यापैकीच एक होते मयत नागेश गायकवाड हे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबार आभाळ कोसळलं. मात्र आता याच गायकवाड कुटुंबासंदर्भात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. पतीला जाऊन 1 महीना होतो ना होतो तोच, मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने आपलं आयुष्य संपवलं आहे. काल रात्री उशीरा त्यांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास लावून जीवन संपवलं. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. त्यांच्या मागे दोन मुली असून आधी वडील गेले, त्यापाठोपाठ आता आईही जग सोडून गेल्या दोन्ही मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सोनाली नागेश गायकवाड अस आत्महत्या केलेल्या महिलेच नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आधी वडीलांना गमावलं पाठोपाठ आईही गेली

गेल्या महिन्यात 8 जुलै रोजी मोशी कचरा डेपोची दुर्घटना घडली होती.त्या परिसरात एक इमारत कोसळली आणि त्या ढिगाऱ्याखाली जवळपास 15 लोक अडकले असल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच, आर्मी, अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केल. जवळपास 2 ते 3 दिवस हे बचावकार्य सुरू होतं. यामध्ये काहींना वाचवण्यात यश ालं, पण अनेकांचा मृत्यू झाला. त्यावरूनच पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा गदारोळही झाला.

याच दुर्दैवी घटनेत नागेश गायकवाड यांचाही जीव गेला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला, त्यांच्या दु:खाला पारावार उरला नाही. नागेश यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब होतं. मात्र काल रात्री अघटित घडलं. नागेश यांच्या मृत्यूने त्यांची पत्नी प्रचंड दुःखी होती, ती खूप तणावात होती अशी माहिती समोर आली आहे. पतीच्या वियोगाच दुःख ती महिला सहन करू शकली नाही आणि अखेर तिने काल रात्री टोकाचं पाऊल उचललं. सोनाली नागेश गायकवाड हिने काल टोकाचं पाऊल उचलत गळफास लाऊन घेतला आणि क्षणात आयुष्य संपवलं. ही घटना समोर येताच प्रचंड खळबळ माजली. आधी दुर्घटनेत वडीलांना गमावलं त्यापाठोपाठ आीही गेल्याने गायकवाड यांच्या मुली आता पोरक्या झाल्या असून शेजारी आणि नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...