खासदार संभाजीराजेंचं काकासाहेब शिंदेंना अभिवादन, 36 जिल्ह्यात मूक आंदोलन, लॉंग मार्चचाही इशारा

सरकारने रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. कोर्टाने ती फेटाळल्यास तातडीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करावी, नंतर आरोग्य स्थापन होईल. त्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता असल्याचंही यावेळी संभाजीराजे म्हणाले.

खासदार संभाजीराजेंचं काकासाहेब शिंदेंना अभिवादन, 36 जिल्ह्यात मूक आंदोलन, लॉंग मार्चचाही इशारा
खासदार संभाजीराजे छत्रपती
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 9:13 PM

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरुन आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना आज अभिवादन केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारनं दिलेल्या नोकरीच्या आश्वासनाची आठवण करुन दिली. अशा कुटुंबातील एकाला लवकर नोकरीवर घ्या, अशी विनंती संभाजीराजे यांनी सरकारला केलीय. त्याचबरोबर मराठा आंदोलनात जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची मागणीही संभाजीराजे यांनी यावेळी केलीय. (MP Sambhaji Raje Chhatrapati greets Kakasaheb Shinde and the victim in Kopardi)

आता समाजाची भूमिका संपली. आता समाजाने नाही तर लोकप्रतिनिधिंनी जबाबदारी घेऊन रस्त्यावर उतरावं. सरकारने रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. कोर्टाने ती फेटाळल्यास तातडीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करावी, नंतर आरोग्य स्थापन होईल. त्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता असल्याचंही यावेळी संभाजीराजे म्हणाले. त्याचबरोबर ओबीसींच्या सवलती गरीब मराठा समाजाला मिळायला हव्या. आता 36 जिल्ह्यात मूक आंदोलन करणार. त्यानंतर राज्यात लॉंग मार्च काढू, असा इशाराही संभाजीराजे यांनी यावेळी दिलाय.

कोपर्डीतील पीडित कुटुंबियांचीही भेट

तत्पूर्वी संभाजीराजे यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाचीही भेट घेतली. कोपर्डी आत्याचार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहजे सरकारने या खटल्यासाठी विशेष बॅच स्थापन करून खटला फास्टट्रॅक वर खटला चालवावा आणि लवकरात लवकर पीडित कुटुंबातील न्यायदेण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी अत्याचार पीडितेच्या स्मारकावर जाऊन अभिवानही केलं.

कोपर्डीच्या भगिनीला अभिवादन करण्यासाठी मी आलो आहे. माझी सरकारला विनंती आहे या प्रकरणी उच्च न्यायालयात एक अर्ज करावा आणि या खटल्यासाठी एक स्पेशल बेंच स्थापन करण्याची विनंती करावी. पुढील सहा महिन्यात हे प्रकरण निकाली काढावं, अशी मागणी संभाजीराजे यांनी केलीय. आपण निर्भयाच्या आई-वडिलांना भेटलो, त्यांचा खूप आक्रोश आहे. त्यांना न्याय पाहिजे. आज या प्रकरणाला चार वर्षे झाली. सरकारला माझी विनंती आहे तुम्ही उच्च न्यायालयात अर्ज करावा. या प्रकरणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. फुले शाहू यांचं आपण नाव घेतो आणि न्याय मिळत नाही, अशी खंतही यावेळी संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

राज्याभिषेक सोहळ्यासाठी मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा; संभाजीराजे छत्रपतींचा आदेश

शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का नाही? : छत्रपती संभाजीराजे

MP Sambhaji Raje Chhatrapati greets Kakasaheb Shinde and the victim in Kopardi