Sanjay Raut : ‘धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे एकदम बरोबर बोलतायत’, SC आजपासून सुरु होणाऱ्या सुनावणीआधी संजय राऊत यांचं महत्वाचं वक्तव्य

Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयात आजपासून शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात सुनावणी सुरु होणार आहे. आता एकनाथ शिंदे गटाचे वकिल त्यांची बाजू मांडतील. या सुनावणीआधी संजय राऊत यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Sanjay Raut : धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे एकदम बरोबर बोलतायत, SC आजपासून सुरु होणाऱ्या सुनावणीआधी संजय राऊत यांचं महत्वाचं वक्तव्य
Eknath Shinde-Sanjay Raut
| Updated on: Sep 02, 2026 | 10:56 AM

सर्वोच्च न्यायालयात आजपासून शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात सुनावणी सुरु होणार आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे वकिल आजपासून युक्तीवाद करतील. त्याआधी उद्धव ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत यांनी काही महत्वाची वक्तव्य केली आहेत. “याआधी तीन वर्षात निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष यांनी भाजप खासकरुन अमित शाहंच्या दबावाखाली निर्णय घेतला. आता अमित शाह स्वत: दबावाखाली आहेत. अमित शाह यापुढे मंत्रिमंडळात राहतील की नाही असं वातावरण दिल्लीत याक्षणी आहे. त्यामुळे आम्हाला ही जी सुनावणी सुरु आहे. भारतीय संविधानासंदर्भात, संविधानाच्या प्रतिष्ठेसाठीची अंतिम लढाई आहे. आता नाही तर कधीच नाही. शिवसेनेच्यावतीने आमचं म्हणणं जे मांडायचं होतं ते मांडून पूर्ण झालेलं आहे. सिब्बल, कामत यांनी धुवाधार युक्तीवाद केला. बेकायदेशीर निर्णयाच्या चिंधड्या उडवल्या” असं संजय राऊत म्हणाले.

“सात ते आठ दिवस यांची सुनावणी चालेल. त्यांचं म्हणणं त्यांचे वकिल मांडतील. काही हरकत नाही. शेवटी न्यायालय खंडपीठ, घटनापीठ म्हणतात संविधानाच्या चौकटीत राहूनच त्यांना निर्णय द्यावा लागेल. कोणत्याही दबावाशिवाय हा निर्णय येईल. देशाला एक ऐतिहासिक स्वच्छ, निर्णय मिळेल. देशाच्या राजकारणात पक्षांतर होतील की नाही असा एक निकाल अपेक्षित आहे” असं संजय राऊत म्हणाले. कॅबिनेटची बैठक टाकून उपमुख्यमंत्री वारंवार बाहेर जातात. राज्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न पडलेले आहेत, समस्या आहेत, लोकर रस्त्यावर आहेत. आदिवासी रस्त्यावर आहे, मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन निर्माण केलं आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री दरेगाव, दिल्लीत जाऊन काय करतात हा गंभीर प्रश्न आहे. ते स्वत: कोर्टात उभे राहणार का?. सत्याच्या बाजूने निकाल लागेल. संविधानाचा विजय होईल” असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘शिंदेंना आयुष्यभर लाज वाटेल’

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी दुर्देवी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “अत्यंत बरोबर बोलतायत ते. धनुष्यबाणी गोठवण्याची वेळ कोणी आणली? या चोरांनीच आणली. लुटलं कोणी? अमित शाह डाकू आहे. मी जबाबदारीने बोलतोय. या डाकूंच्या मदतीने भाजपच्या डाकूच्या सरदाराच्या मदतीने बाळासाहेबांना पवित्र असलेला धनुष्यबाण चोरला, डाका घातला” “डाका घालून निवडणुका लढताय. आधी काय केलं पाहिजे, मुद्देमाल जप्त केला पाहिजे. शिंदेंना कायदा कळतो का?. आधी मुद्देमाल जप्त करावा लागेल. मुद्देमाल जप्त केल्यावर निर्णय येईल. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची वेळ शिंदेंनी आणली. निकाल लागले त्यावेळी शिंदेंना आयुष्यभर लाज वाटेल. ही चिन्ह गोठवण्याची मागणी करण्याचीवेळ तुमच्यामुळे आली आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us