Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
राठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याच्या विरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मराठवाड्यात कुणबी नोंदीनंतर किती अर्ज दाखल झाले आणि त्यापैकी किती कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, याची माहिती जरांगे पाटील यांना दिली.
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याच्या विरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मराठवाड्यात कुणबी नोंदीनंतर किती अर्ज दाखल झाले आणि त्यापैकी किती कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, याची माहिती जरांगे पाटील यांना दिली. मात्र, हा विषय अधिकाऱ्यांच्या पातळीवरचा नसून सरकारशी संबंधित असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास नकार दिला. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणबी नोंदीनंतर मराठवाड्यात एकूण 3,500 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 3,372 जणांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्रासंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा नोडल अधिकारी नेमण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. हे नोडल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत राहणार असून विविध विभागांतील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे काम ते करतील. हे अधिकारी शक्यतो मराठा समाजातील असतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यानंतरची गॅझेट सरसकट लागू करण्याबाबत कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महाअधिवक्त्यांचा अभिप्राय घेतल्यानंतर सातारा, कोल्हापूरसह इतर गॅझेट लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारीही समोर आली आहे. कुणबी नोंद मिळाल्यानंतर प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडे 2 लाख 98 हजार 872 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 2 लाख 98 हजार 51 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
प्रमाणपत्र वाटपानंतर वैधतेसाठी 13 हजार 754 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 11 हजार 422 प्रमाणपत्रे वैध ठरवण्यात आली असून, काही अर्ज अद्याप प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून कुणबी नोंदीच्या आधारे ही प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली ही आकडेवारी महत्त्वाची मानली जात आहे.

