AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंनी घेतलं लंडनमध्ये अॅडमिशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरेट देणाऱ्या कॉलेजशी आहे खास कनेक्शन

Shrikant Shinde LSE Education : कल्याण मतदार संघाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आता लंडनमध्ये शिकायचा निर्णय घेतला आहे.

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंनी घेतलं लंडनमध्ये अॅडमिशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरेट देणाऱ्या कॉलेजशी आहे खास कनेक्शन
Shrikant Shinde LSE EducationImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 9:14 PM
Share

गिरीश गायकवाड, टीव्ही ९ मराठी, मुंबई : कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये TRIUM ग्लोबल एमबीए प्रोग्रामच्या पहिल्या मॉड्यूलला सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव त्यांनी आपल्या पोस्टमधून सांगितला. ऑर्थोपेडिक्समधील एमएसनंतर ही त्यांची दुसरी पदव्युत्तर पदवी असल्याचं त्यांनी नमूद केलं. या नव्या शिक्षणाचा उपयोग महाराष्ट्र आणि देशाच्या सेवेत करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक सविस्तर पोस्ट लिहून माहिती दिली आहे.

श्रीकांत शिंदे यांची पोस्ट जशीच्या तशी

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स (LSE) मध्ये माझ्या ट्रायम (TRIUM) ग्लोबल एमबीए प्रोग्रामच्या पहिल्या मॉड्यूलचा पहिला दिवस आज पार पडला. कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्यावर अनेक गोष्टींनी लक्ष वेधले, पण मला मनापासून स्पर्शून गेला तो क्षण म्हणजे कॅम्पसमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभे राहण्याचा.

अनेक दशकांपूर्वी ज्या महामानवाला अस्पृश्यतेमुळे वर्गाच्या बाहेर बसावे लागले होते, त्यांनी याच ऐतिहासिक संस्थेत प्रवेश घेतला. आपल्या अथांग बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ हा जगप्रसिद्ध प्रबंध लिहून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (DSc) ही पदवी मिळवली. पुढे जाऊन त्यांनीच भारताला संविधान दिले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) स्थापनेचा पाया रचला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” त्यांच्या पुतळ्यासमोर उभे राहिल्यावर त्यांच्या या वाक्याचा खरा अर्थ आणि गांभीर्य उमगते.

कल्याण, महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी असलो तरी आज इथे मी सर्वप्रथम एक विद्यार्थी आहे. ज्या सभागृहात बाबासाहेबांच्या विचारांचे वलय निर्माण झाले, तिथेच उभे राहताना एका शांत अभिमानाची आणि विचारांच्या अथांग ताकदीची जाणीव झाली. ऑर्थोपेडिक्समधील एमएस (MS in Orthopaedics) पूर्ण केल्यानंतर ही माझी दुसरी पदव्युत्तर पदवी आहे. वैद्यकीय शिक्षणामुळे मला रुग्णांवर उपचार करण्याचे आणि त्यांना जीवन देण्याचे कौशल्य मिळाले, तर हा नवीन प्रवास मला गुंतागुंतीच्या आर्थिक समस्या आणि धोरणे समजून घेण्यास मदत करेल. विषय बदलला असला तरी शिकण्याची माझी उत्सुकता तीच आहे. मी नेहमीच मनापासून एक विद्यार्थी राहिलो आहे आणि ही शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबणार नाही.

पुन्हा एकदा तेच कॉलेजचे दिवस, तेच व्याख्याने आणि वैचारिक चर्चांचे सत्र सुरू झाले आहे; फरक एवढाच की या वेळी अनुभवाची जोड आहे. हे सर्व ज्ञान आणि अनुभव मला माझ्या कार्यात, माझ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सेवेत प्रभावीपणे वापरता येईल, याचा विश्वास आहे. या निमित्ताने सर्व तरुण मित्रांना एवढेच सांगेन की, कोणतीही पदवी, नोकरी किंवा पद तुम्हाला मिळो, पण तुमचे शिकणे कधीही थांबवू नका. “मानवी मनाचे संवर्धन हेच मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे,” असे बाबासाहेब म्हणायचे. आजचे जग वेगाने बदलत आहे, त्यामुळे नेहमी उत्सुक राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा