MPSC Exam : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे लांबणीवर

एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे.

MPSC Exam : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे लांबणीवर
एमपीएससीची मोठी भरतीImage Credit source: mpsc website
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 9:14 PM

मुंबई : एमपीएससी (MPSC Exam) गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे. 5 आणि 12 फेब्रुवारीला ही परीक्षा (MPSC Mains Exam) होणार होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केल्यानं परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती आयोगाकडून दिली गेली आहे. एमपीएससी आयोगाने ट्विट करत परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत माहिती दिली नाही, काही विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढ्याचा मार्ग स्वीकारल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ एसपीएससी आयोगावर आली आहे. गेल्या काही महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेकदा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे पाहिलं आहे. यावरून विद्यार्थी अनेकदा आक्रमकही होतात. कोरोनामुळेही अनेकदा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते.

एमपीएससीचे ट्विट काय?

Mpsc विद्यार्थ्यांच्या याचिवर 2 फेब्रुवारीला सुनावणी होणार

एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात जी याचिका दाखल केली आहे, त्यावर येत्या 2 फेब्रुवारीला सुनवाणी होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे याचिकार्ते तसेच इतर विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे. ही सुनवणी पूर्व परीक्षा गट ब यासाठी असणार आहे. या मुख्य परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांनी ही याचिका कोर्टात दाखल केली आहे, आम्हालाही मुख्य परीक्षेला बसू देण्यात यावं अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यामुळे न्यायालय याबाबत या विद्यार्थ्यंना दिलासा देणार का ? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आयोगाने तीन प्रश्न रद्द केल्याचा फटका

एसपीएससी आयोगाने पूर्व परीक्षेतील तीन प्रश्न रद्द केल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे, असे मत विद्यार्थ्यांनी कोर्टात मांडले आहे. यामुळे आमचे नुकसान झाले आहे, आयोगाच्या प्रश्न रद्द करण्यामुळे आम्हाला मुख्य परीक्षेला बसता येत नाही, तर न्यायालयाने आम्हाला मुख्य परीक्षेला बसण्याची परवागी द्यावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी न्यायलायत लढा सुरू केला आहे.

मंत्रालयात प्रताप सरनाईकांची फाईल बघायला गेलो, माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा, सोमय्यांचं ओपन चॅलेंज

Wine in Maharashtra: वाईन, बियर आणि व्हिस्कीमध्ये फरक काय?, फायदे की तोटे?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Wine in Maharashtra: भरकटलेल्या सरकारचा हा भरकटलेला निर्णय, बेवड्यांची काळजी, निर्णयानंतर भाजप आक्रमक

Non Stop LIVE Update
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.