तर आम्ही आमची ताकद दाखवू, रोहित पवारांचा थेट पोलिसांना इशारा, एमपीएससी आंदोलन तापणार?

पुण्यातील एमपीएससी आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले आहे. विद्यार्थी आक्रमक भूमिकेत येत असल्याचं चित्र आहे. रोहित पवारांनी यावेळी पोलिसांना इशारा दिला. नेमकं काय घडलं?

तर आम्ही आमची ताकद दाखवू, रोहित पवारांचा थेट पोलिसांना इशारा, एमपीएससी आंदोलन तापणार?
Rohit Pawar MPSC Protest Pune
Image Credit source: social media
| Updated on: Oct 08, 2026 | 7:28 PM

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी विविध घडामोडी घडत आहेत. विद्यार्थी ज्याठिकाणी आंदोलन करत आहेत. तिथे वाहनांचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. यावेळी मुद्दामहून पोलिस विद्यार्थ्यांच्या मोर्चाच्या दिशेने वाहने फिरवत असल्याचा दावा केला. त्यानंतर थोड्या वेळापूर्वी रोहित पवारांनी संवाद साधला. यावेळी आमदार रोहित पवार अत्यंत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी पोलिसांना थेट इशाराच दिला आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

पोलिसांनी पुढील 15 मिनिटात योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही अलका टॉकीज चौकात जाऊन बसावे लागेल. कृपा करुन ईकडे वाहने डायव्हर्ट केल्याने त्यांना त्रास होतोय. तुम्हाला, फोटो, व्हिडीओ काढून त्याचा वापर कोर्टात करायचा असेल तर मग आम्ही आमची ताकद दाखवू. आम्ही पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मागील 7 दिवस ट्रॅफिक वळवले होते. मात्र कालपासून वाहने ईकडे पाठवत आहेत. पण गाडी विद्यार्थ्यांच्या पायावर वगैरे गेली तर मग अवघड आहे. पोलिसांनो तुम्ही लय शहाणे आहात हे दाखवू नका, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Loading...

रोहित पवारांच्या भूमिकेनंतर विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे. त्यानंतर रोहित पवार म्हणाले की, पोलिसांना 10 – 15 मिनिटे देऊ. जर आम्ही अलका चौकात जाऊन बसलो तर आम्ही उठणार नाही. काय कारायचे ते करा. दरम्यान, रोहित पवारांच्या आक्रमकतेनंतर पोलिसांनी एस. एम. जोशी पुलावरील वाहतूक बंद केली. तुम्ही नोटीस दिल्या म्हणून हे विद्यार्थी गप्प बसणार नाहीत, असा इशाराही यावेळी आमदार रोहित पवारांनी दिला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये पुण्यामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी उपोषण आणि आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पुण्याहून मुंबईच्या दिशेने हलवण्याच्या भूमिकेतही जाणार असल्याची चर्चा आहे. यासाठी विद्यार्थ्यांनीही संमती दर्शवल्याची माहिती समोर आली होती. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते हे रोज या आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडेही लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us