मोठी बातमी: ‘या’ इंजेक्शनसाठी आता रुग्णालयांना द्यावे लागणार हमीपत्र

आता प्रशासनाने एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सच्या वापरासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. | mucormycosis amphotericin b

मोठी बातमी: 'या' इंजेक्शनसाठी आता रुग्णालयांना द्यावे लागणार हमीपत्र
म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरेसिन बी इंजेक्शन
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 8:55 AM

कोल्हापूर: राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोनाचा धोका अजूनही कायम असलेल्या कोल्हापुरात आता स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापुरात म्युकोरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या एम्फोटेरेसीन बी (amphotericin b injection) या इंजेक्शनसाठी रुग्णालयांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.  (Affidavit required for using amphotericin b injection uses in Kolhapur)

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या कोल्हापुरात म्युकरोमायकोसिसच्या 84 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सच्या वापरासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. यामध्ये रुग्णालयांना हमीपत्र देण्याच्या अटीचा समावेश करण्यात आला आहे.

‘एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा साठा कमी’

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा साठा सध्या कमी आहे. अशावेळी अंदाजे 1 लाख 90 हजार इंजेक्शनच्या ऑर्डर दिल्याची माहिती टोपे यांनी दिली होती. मात्र या कंपन्या डिलिव्हरी करत नाहीत. केंद्र सरकारने कंट्रोल केल्यानं सध्या इंजेक्शनचा सप्लाय होत नाही. हे इंजेक्शन केंद्रानं राज्य सरकारला द्यावे, अशी राज्य सरकारची मागणी असल्याचं टोपे यांनी सांगितलं. तसंच या इंजेक्शनबाबतही आपण ग्लोबल टेंडर काढल्याची माहिती त्यांनी दिलीय. मात्र, त्याचा पुरवठा आपल्याला 31 मे नंतर होणार असल्याचं टोपे यांनी सांगितले होते.

‘कोल्हापुरात दुकाने उघडी ठेवण्याची वेळ वाढवा’

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 9 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. परवानगी न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. ब्रेक द चेन नियमावली अंतर्गत कोल्हापूर जिल्हा हा तिसऱ्या स्तरात मोडतो. त्यामुळे सध्या दुकानांसाठी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंतची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ही वेळ आणखी वाढवून मिळावी, असा व्यापाऱ्यांचा आग्रह आहे.

संबंधित बातम्या :

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा मोठा तुटवडा, रोज 20 हजार इंजेक्शन्सची गरज, केंद्राकडून पुरवठा फक्त 5 हजार!

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?

औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी, रुग्णांची संख्या पावणे सहाशेवर!

(Affidavit required for using amphotericin b injection uses in Kolhapur)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.