MukhyaMantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, आज तुमच्या खात्यात…

Ladki Bahin Yojana February Month Installment: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महीना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहे. मात्र आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

MukhyaMantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, आज तुमच्या खात्यात…
| Updated on: Feb 27, 2025 | 9:48 AM

Ladki Bahin Yojana February Month Installment: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महीना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहे. मात्र आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे. नव्या निकषानुसार, लाडक्या बहिणींच्या खात्यत हे पैसे जमा होऊ शकतात. काही तांत्रिक कारणांमुळे आत्तापर्यंत हे पैसे जमा झाले नव्हते. मात्र आता, आज हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या निकषांनुसार, हे पैसे जमा होतील. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकत आहे. लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी होत्या. त्यांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात असून निकषांत न बसणाऱ्या महिलांन वगळून फक्त गरजू बहि‍णींनाच योजनेचा लाभ देण्याचे प्रकार समोर येत आहे. या पडताळणीनंतर आत्तापर्यंत एकूण 9 लाख बहिणी बाद झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वित्त विभागाकडून 3 कोटी 490 कोटी वर्ग करण्यात आले आहेत.

आज मिळणार हप्ता ?

जानेवारी महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यात जमा झाले होते. मात्र फेब्रुवारी महीना उलटून आता संपतही आला, आज 27 तारीख आहे, पण तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे काही जमा झालेले नाहीत. मात्र आता आज हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होऊन त्यांना या महिन्याचे 1500 रुपये मिळतील अशी चर्चा आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळू शकतो.