Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये, तुमचं नावही आहे का लिस्टमध्ये ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. फेब्रुवारी महिन्याच हप्ता मिळण्यास त्यांना नुकतीच सुरूवात झाली. या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी हे बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र आता लाडक्या बहीणींना मोठा झटका बसला असून लाखो लाभार्थी महिलांवर टांगती तलवार आहे.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये, तुमचं नावही आहे का लिस्टमध्ये ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
Image Credit source: social media
| Updated on: Mar 31, 2026 | 10:15 AM

राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी महायुती सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सर्वांनाच माहीत आहे. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्यास 1500 रुपये मिळतात, जे त्यांच्या खात्यात जमा होतात. नुकताच या योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे लाडक्या बहीणींमध्ये आनंदाच वातावरण आहे. मात्र आता याच योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.  लाडकी बहीण योजनेसाठी पावणे दोन कोटी महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र , सुमारे 71 लाख लाभार्थी महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत.

ईकेवायसनंतर घटली लाभार्थी महिलांची संख्या

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यावर सुरुवातीला प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या ही कोट्यवधी होती. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आलं. अनेक सरकारी कर्मचारी, तर काही पुरूषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. अनेक गैरप्रकार उघडकीस आल्यावर अखेर पडताळणी सुरू करण्यात आली आणि त्यासाठी ई-केवायसीदेखील बंधनकारक करण्यात आली होती. याच ई-केवायसीच्या मुदतीचा आज, 31 मार्च 2026 हा शेवटचा दिवस आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी पावणे दोन कोटी लाडक्या बहिणी पात्र होत्या. तर पडताळणीनंतर सुमारे 71 लाख लाभार्थी योजनेतून बाद झाल्या. योजनेच्या सुरुवातीला 2 कोटी 47 लाख लाभार्थी महिला होत्या ई-केवायसी केल्यावर लाभार्थी महिलांची संख्या आता 1 कोटी 76 लाखांवर आली आहे. त्यामुळे आता बाद झालेल्या लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नसून त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.

फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरूवात

लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळण्यास सुरूवात झाली आहे. चार दिवसांपूर्वी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे, असं तटकरे यांनी नमूद केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us