
Muktainagar Assembly Elections 2024: संत मुक्ताई यांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेले मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातील समृद्ध तालुका आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या हा मतदार संघ आहे. 1967 पासून ते 1985 पर्यंत प्रतिभाताई पाटील मुक्ताईनगर तालुक्याच्या (तेव्हाचे एदलाबाद) आमदार होत्या. प्रतिभाताई पाटील काँग्रेसमध्ये असताना या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर मात्र कोथळी गावातील सरपंच एकनाथ खडसे यांनी या भागात भाजपला वाढवण्याचे काम केले. ते 1989 मध्ये पहिल्यांदा या मतदार संघातून आमदार झाले. त्यानंतर मात्र सातत्याने त्यांचाच विजय या ठिकाणी राहिला. 1989 ते 2019 त्यांनीच या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केला. त्या काळात राज्यात भाजप वाढवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पक्षांने त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद आणि विरोधी पक्षनेतेपदही दिले. परंतु 2019 मध्ये त्यांनी तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर मुक्ताईनगर मतदार संघातील गणिते बदलली. आता पुन्हा खडसे यांची मुलीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे आणि विद्यामान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात लढत होत आहे. मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांच्या भावजय असलेल्या...