BMC : मुंबईचे रस्ते फॉरेनच्या रोड सारखे चमकणार, महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. हिवाळ्यात वाढणाऱ्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता खालावते. यासाठी आता पालिकेने १२५ पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळा वगळता वर्षभर हे टँकर मुंबईतील मुख्य आणि गल्लीबोळातील रस्ते धुणार आहेत.

BMC : मुंबईचे रस्ते फॉरेनच्या रोड सारखे चमकणार, महापालिकेचा मोठा निर्णय
महापालिकेचा मोठा निर्णय
| Edited By: | Updated on: Feb 19, 2026 | 10:10 AM

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा स्तर बिघडत चालला आहे. वायूप्रदूषण प्रचंड वाढल्याचं दिसत असून AQIवरही परिणाम दिसून आला. गेल्या काही वर्षांपासून हिवाळा आला की मुंबईतील प्रदूषण वाढते आहे. त्यामुळे आता शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेतील धूलिकरण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसून तयारी सुरू केली आहे. आता शहरातील वायूप्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा घनकचरा विभाग कामाला लागला असून रस्त्यांवर उडणारी धूळ रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुण्यात येणार आहेत. पावसाळा वगळून उरलेल्या सुमारे दीडशे दिवसांसाठी रस्ते धुण्याकरीता 125 पाण्याचे टँकर भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. तसेच शहरांतील गल्लोगल्लीतील रस्ते धुण्यासाठी यामध्ये लहान टँकरही घेण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबईचे रस्ते फॉरेनच्या रोड सारखे चमकणार

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा स्तर बिघडत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. वायू प्रदूषणाबाबत मुंबई महापालिकेने यापूर्वीच तयार केलेली नियमावली पुन्हा एकदा लागू करण्यात येणार आहे.
पावसाळा सोडा तर इतर महिन्यांत मुंबईत प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढते. बांधकाम, रस्त्यावरील वाहनाची वर्दळ, धूळ या सर्वांमुळेच प्रदूषणाच्या पातळीत खूप वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे रस्त्यांवर साचणारी धूळ दाबण्यासाठी उपाय म्हणून पालिकेने दोन गटांत ही निविदा प्रक्रिया राबवली आहे. आता अत्याधुनिक मोबाईल वॉटर मिस्टिंग आणि स्प्रिंकलर यंत्रणा भाडेतत्त्वावर तैनात करण्यात येणार आहे. यामध्येवाहनांवर आधारित मोबाईल मिस्टिंग युनिट्सचा समावेश असेल.

यापूर्वीही ही धूळ हटवण्यासाठी रस्ते पाण्याने धुण्याचा पर्याय मुंबई महापालिकेने आणला होता. त्याकरीता काही टँकरही भाड्याने घेण्यात आले होते. मात्र या टँकर्सं कॉन्ट्रॅक्ट संपलं असून आता नव्याने 125 टँकर हे भाड्याने घेतले जाणार आहेत. मुंबईतील रस्ते धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची संख्या यंदा वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून 125 पाण्याचे टँकर भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.

पावसाळ्याचे काही महिने सोडले, तर इतर कालावधीत या टँकरच्या सहाय्याने सुमारे 150 दिवस मुंबईतील रस्ते धुण्यात येणार आहेत अशी महिती समोर आली आहे. मात्र मोठया पाण्याच्या टँकरने गल्लोगल्लीतील रस्ते धुणे अवघड होतं, हे लक्षात घेऊन छोट्या गल्ल्यांसाठी यंदा लहान टँकरही भाड्याने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आता मुंबईचे रस्ते एकदम स्वच्छ, चकाचक दिसतील हे नक्की.