मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, एक्युआय थेट 228 वर, वाईट श्रेणीत…

सतत वातावरणात मोठा बदल होताना दिसतोय. त्यामध्येच मुंबईमध्ये वायुप्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे सध्या बघायला मिळतंय. नागरिकांनी आरोग्याच्या धोक्यामुळे पुन्हा मास्क वापरायला सुरवात केली. सायंकाळी आणि सकाळी प्रदूषण वाढल्यामुळे पूर्णपणे धुळ बघायला मिळते.

मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, एक्युआय थेट 228 वर, वाईट श्रेणीत...
Air pollution in Mumbai
| Updated on: Nov 24, 2025 | 7:59 AM

मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस, थंडी तर मध्येच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पाऊस सुरू होता. दुसऱ्या आठवड्यात कडाक्याची थंडी होती तर आता पुन्हा एकदा वातावरण बदलले असून ढगाळ पावसासारखे वातावरण झाले आहे. त्यामध्येच मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ झाली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीची चाहूल जाणवत असतानाच वायुप्रदूषणाचे प्रमाणही झपाट्याने वाढतंय. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अनेक ठिकाणी वाईट श्रेणीत नोंदवला गेल्या आहेत. आज एक्युआय 228 वर पोहोचलाय.

मुंबईत झपाट्याने वाढले वायुप्रदूषण हवा दूषित 

नागरिकांनी आरोग्याच्या धोक्यामुळे पुन्हा मास्क वापरायला सुरवात केली. सायंकाळी आणि सकाळी प्रदूषण वाढल्यामुळे पूर्णपणे धुके बघायला मिळते. शहरात विकासकामांमधून होणाऱ्या धूळप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात विशेष पथके नियुक्त केल्याचा दावा पालिका करत आहे. मात्र, ही पथके प्रत्यक्षात काम करत आहेत का, असा गंभीर सवाल माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप उपाध्यक्ष रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांवर वाढलेल्या प्रदूषणामुळे मास्क घालण्याची वेळ 

बीकेसी, कुर्ला, माझगाव, मालाड, देवनार, कांजूरमार्ग, शिवाजी नगरसह अनेक भागांत हवा सतत दूषित श्रेणीत असून वातावरणातील PM-10 धूलिकणांचे प्रमाण वाढलेलेच आहे. बांधकामांमधील धूळ, रस्त्यांवरील धुरळा, वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक क्रिया आणि कचरा जाळणे हे या कणांचे मुख्य स्रोत असल्याने मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झालाय.

वाढलेल्या प्रदूषणामुळे आजारी पडण्याचेही प्रमाण वाढले 

मनपाकडून नियमभंग करणाऱ्या विकासकांना नोटीस दिल्या जात आहेत. मात्र, ते पर्याप्त आहे का असा सवाल ऊपस्थित केला जात आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे आजारी पडण्याचेही प्रमाण वाढल्याचे सध्या चित्र बघायला मिळते. सातत्याने आरोग्याच्या आणि विशेष: श्वसनाच्या समस्या निर्माण होत आहेत. मुंबईतील प्रदूषणामुळे लहान मुलांसह मोठी माणसे देखील आजारी पडताना दिसत आहेत. मुंबईतील वाढलेल्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या गंभीर बनत चालल्या आहेत.