AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांवर दुहेरी संकट, AQI धोकादायक पातळीवर, कशी घ्याल काळजी?

मुंबईत सध्या गारठा आणि वाढत्या प्रदूषणामुळे दुहेरी हवामान संकट निर्माण झाले आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) धोकादायक पातळीवर असून, तापमानात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे श्वसन आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबईकरांवर दुहेरी संकट, AQI धोकादायक पातळीवर, कशी घ्याल काळजी?
mumbai 1
| Updated on: Nov 21, 2025 | 10:52 PM
Share

मुंबईकरांना सध्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यासोबतच आता मुंबईत प्रदूषणही वाढले आहे. त्यामुळे सध्या मुंबईकरांना दुहेरी हवामान संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या मुंबई शहरात सर्वत्र धूरकट वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १७६ वर पोहोचला आहे. याचा अर्थ सध्या मुंबईतील हवा असमाधानकारक (Moderate to Poor) आहे. अनेक उपनगरांमध्ये हा आकडा २०० च्याही पुढे गेला आहे, ज्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होताना दिसत आहेत. बांधकाम, वाहनांचा धूर आणि कमी वाऱ्यामुळे प्रदूषक घटक जमिनीच्या जवळ अडकून राहिले आहेत. वाढलेले प्रदूषण आणि हवेतील गारठा यामुळे श्वसनाचे त्रास असलेल्या लोकांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

एकीकडे प्रदूषणाची समस्या असताना, दुसरीकडे मुंबईत गारठा चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रात्री किमान तापमान सुमारे २१ अंश सेल्सियस नोंदवण्यात येत आहे. हे तापमान सध्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या सरासरी तापमानापेक्षा तब्बल पाच अंशांनी कमी आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबरपर्यंत तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरांमध्ये विशेषतः सांताक्रूझ वेधशाळेत हा पारा १६ अंश सेल्सियसच्या आसपास नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना नोव्हेंबरमध्येच हिवाळ्यातच हुडहुडी भरल्याचे दिसत आहेत.

थंडी वाढण्याचे कारण काय?

सध्या जाणवणारी ही थंडी प्रामुख्याने मध्य आणि उत्तर भारतातून मुंबईकडे वाहणाऱ्या उत्तरी आणि ईशान्य दिशेच्या थंड वाऱ्यांमुळे आहे. या वाऱ्यांमुळे मुंबईच्या वातावरणात थंड आणि कोरडी हवा प्रवेश करत असून, त्यामुळेच तापमानात ही तात्पुरती घट झाली आहे. मात्र, हवामान तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत वाऱ्याची दिशा बदलल्यास तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी सूचना

या दुहेरी हवामान संकटामुळे डॉक्टरांनी श्वसनाचे आजार (Respiratory Issues), दमा (Asthma) आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे

  • मॉर्निंग वॉक टाळा: सकाळी लवकर आणि रात्री उशिरा घराबाहेर पडणे टाळावे, कारण या वेळी तापमान कमी आणि प्रदूषणाची पातळी (AQI) सर्वाधिक असते.
  • मास्कचा वापर: प्रदूषित भागात जाताना N95 मास्क वापरावा.
  • उबदार कपडे: थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपड्यांचा आणि स्वेटरचा वापर करावा.
  • पाणी: शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.