AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींच्या दौऱ्याआधी शेलारांचं अस्सल मालवणीत गाऱ्हाणं; म्हणाले, ‘पनवती’ त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!

Ashish Shelar Tweet on PM Narendra Modi on Sindhudurg Daura : बडबड करतलो तो राऊतांचो झिल! जनसेवक पंतप्रधानांचो अपमान करणाऱ्याचाकाय ता बघून घे रे महाराज्या!; पंतप्रधानांच्या मालवण दौऱ्याआधी आशिष शेलार यांचं अस्सल मालवणी गाऱ्हाणं, शेलार नेमकं काय म्हणाले? वाचा...

मोदींच्या दौऱ्याआधी शेलारांचं अस्सल मालवणीत गाऱ्हाणं; म्हणाले, 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!
| Updated on: Dec 04, 2023 | 1:12 PM
Share

मुंबई | 04 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. नौदल दिनानिमित्तच्या कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.त्यांच्या या दौऱ्याआधी भाजप नेते आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये शेलार यांनी गाऱ्हाणं घातलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर भाष्य करतानाच त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. व्हय महाराज्या! म्हणत आशिष शेलार यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे.

आशिष शेलार यांचं ट्विट जसंच्या तसं

मा. नरेंद्र मोदी हे सगळ्यात पयले पंतप्रधान आसत जे आपल्या मालवणाक भेट देत हत…

नायतर आजतागायत इतके पंतप्रधान झाले हयसर कोणी एकान सुद्धा इच्छा आपणांक भेटूची इच्छा सुद्धा दाखवल्यान नाय…

आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींका शिवाजी महारांजांच्या रणनिती आणि आरमाराचा कौतुक म्हणान त्यांनी भारतीय नौदलाच्या नवीन झेंड्याचा डिझाईन महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार केल्यानी असा. आपल्या भारताच्या नौसेनेच्या एका लढाऊ बोटीक “मालवण” असा नाव दिल्यानी असा ..

आपल्या मालवानातल्या छ. शिवाजी महाराज्याच्या राजकोट किल्ल्यात भव्य अश्या पुतळ्याचा अनावरण होतला हा म्हणजे देशात पयल्यांदा आरमार उभारुची दूरदृष्टी असलेल्या आपल्या राजाक दिलेली ही मानवंदनाच असा.

बडबड करतलो तो राऊतांचो झिल… पत्रकार पोपटलाल… आता पंतप्रधानांचे आभार मानायचे सोडून कायतरी खुसपाट काढून वडाची साल पिंपळाक लावतले. बाकी ह्यांका काम काय हा दुसरा? धाक नाय दारारो, फुकटचो नगारो!

म्हणान आज गाऱ्हांना घालूनच टाकूया आणि ही काय ती इडा पिडा मागे लागली हा ती पळवून लावया!

हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहरांच्या देवा ….होय म्हाराज्या.. आई भराडी आणि रवळनाथा महाराज्या ..

उबाठा वडाची साल पिंपळाक लावतत… तोंडाक येता ता बोलत सुटले आसत, त्यांका वाईच अक्कल दी रे महाराज्या… इंडिया आघाडी करून जनतेक लुटुचो डाव करतत त्यांका सगळ्यांचा तुझो हिसको दाखव रे महाराज्या… जनसेवक पंतप्रधानांचो अपमान करतत.. त्यांचा काय ता बघून घे रे महाराज्या! त्यांचीच “पनवती” त्यांच्याच घशात घाल.. रे महाराज्या..!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.