भावाचे लग्न 15 दिवसांवर असताना प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूचा सापडला मृतदेह, कुटुंबियांचा मोठा खुलासा…
सागरचा शोध सुरू असतानाच मेंढवन खिंडीतील जंगलात त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पालघर तालुक्यातील मेंढवन खिंडीतील जंगलात मुंबईतील माजी अंडर-16 फुटबॉलपटू सागर सोरती (वय 35) याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली आहे. सागर हा 15 नोव्हेंबरला पुणे येथे फुटबॉल खेळायला जात आहे, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तो कुटुंबियांच्या संपर्कात नव्हता. कुटुंबियांकडून सागरचा शोध घेतला जात होता. पुण्याला तो गेलाच नसल्याचीही माहिती त्याच्या कुटुंबियांना मिळाली. सागरच्या लहाण्या भावाचे लग्न 15 दिवसावर असल्याने कुटुंबियांकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच सागर गायब झाल्याने कुटुंबात एकच खळबळ उडाली.
प्रसिद्ध फुटबॉलपटूचा सापडला मृतदेह
सागरचा शोध सुरू असतानाच मेंढवन खिंडीतील जंगलात त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दाैरीच्या मदतीने त्याने स्वत: संपवले. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सागरच्या जवळ त्याचा मोबाईल फोन पोलिसांना आढळून आला. फोनवरून पोलिसांना समजले की, हा फुटबॉलपटू सागर सोरती आहे. पोलिसांनी कुटुंबियांना याबद्दलची माहिती दिली.
मोबाईलमुळे लागला सुगावा पोलिस तपासात माहिती
कुटुंबियांनी सांगितले की, तो गेल्या दोन वर्षांपासून कोणत्यातरी कारणाने मानसिक तणावात होता. हेच नाही तर लहान भावाचे लग्न तोंडावर असताना कुटुंबियांनी त्याला नवीन कपडे शिवण्यास सांगितले असता त्याने नकार दिला होता. त्यामुळे कुटुंबिय चिंतेत होते. त्यामध्येच फुटबॉल मॅचसाठी पुण्याला जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला आणि त्याचा संपर्क झालाच नाही.
जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह
पालघर पोलिसांनी सागरचा मृतदेह मुंबईतल्या जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल पुढे आल्यानंतर स्पष्ट होईल की, कारण नेमके काय आहे आणि त्यानुसार पोलिस पुढील कारवाई करतील. तब्बल दोन वर्षांपासून सागर तणावात असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
