Mumbai lockdown|मुंबईत लॉकडाऊन लागणार का, महापौर पेडणेकरांनी काय दिला इशारा?

महापौर पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईमध्ये कोरोनाचे वाढणारे रुग्ण पाहता शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आता पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाईन सुरू राहतील.

Mumbai lockdown|मुंबईत लॉकडाऊन लागणार का, महापौर पेडणेकरांनी काय दिला इशारा?
Kishori Pednekar
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 12:58 PM

मुंबईः कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात मुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनचे सावट वेगळेच. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले. शिवाय मुंबईत लॉकडाऊन लावणार का, याबाबत सूचक वक्तव्य केले. काय म्हणाल्या पेडणेकर, जाणून घेऊयात.

शिवसेनेने कार्यक्रम केले रद्द

महापौर पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईमध्ये कोरोनाचे वाढणारे रुग्ण पाहता शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आता पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाईन सुरू राहतील. शिवसेनेने स्वतः दोन कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे तुम्हीही मोठी गर्दी आणि कार्यक्रम जरूर टाळा, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय महापालिका आयुक्त इक्बाल चहल हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

तर केंद्राच्या नियमानुसार…

महापौर म्हणाल्या की, ओमिक्रॉनला घाबरू नका. मात्र, सारे चिंताजनक आहे. लॉकडाऊन असताच कामा नये. आत्ता सगळे सावरतायत. लॉकडाऊनमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आपण प्रत्येकाने ठरवले तर लॉकडाऊन टाळता येईल. गर्दी करणार नाही, गर्दीत जाणार नाही, असा निर्धार करा. घरातील सर्वांचे लसीकरण करा. मास्क काढणार नाही. बसमध्ये काय सगळीकडेच नियम पाळेन. मास्क न लावता फिरणार नाही. आपल्यामुळे इतरांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय 20 हजारांचा आकडा क्रॉस झाला, तर केंद्राच्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल, असा इशारा त्यांनी लॉकडाऊनबाबत दिला.

मुख्यमंत्री बोलतील

महापौर पेडणेकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री साऱ्यांशी स्वतः दोन दिवसांमध्ये संवाद साधतील. मुंबईत ओमिक्रॉनचे 157 रुग्ण होते. त्यातील मुंबईतले 73 आणि बाहेरचे 84 आहेत. मात्र, यातील बहुतांश जणांची तब्येत चांगली असून, त्यांना डिस्चार्ज दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मात्र, वाढते रुग्ण पाहता साऱ्यांनीच काळजी घ्यावी. लॉकडाऊन असता कामा नये, यासाठी साऱ्यांनी प्रयत्न करावेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये म्हणून सावध व्हावे. तुम्ही स्वतः सुपर स्प्रेडर होऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Jalgaon| भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस; पात्रतेबाबत काय होणार निर्णय?

VIDEO: जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार; गोपीचंद पडळकर यांची खोचक टीका

VIDEO : जब घी सीधी उंगली से ना निकले तो…! मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी मुलीने केला खतरनाक स्टंट, तरूणालाही मिळाली शिक्षा!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.