Jalgaon| भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस; पात्रतेबाबत काय होणार निर्णय?

Jalgaon| भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस; पात्रतेबाबत काय होणार निर्णय?
Jalgaon Municipal Corporation

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भाजपच्या 29 नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. या सुनावणीत काय होणार, भाजपचे नगरसेवक पात्र ठरणार की अपात्र हे पाहणे मोठे रंजक असणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 04, 2022 | 12:11 PM


नाशिक/जळगावः राज्याच्या राजकारणात भूकंप करणाऱ्या आणि सत्ताधारी भाजपच्या हातावर तुरी देऊन शिवसेनेच्या गळाला लागलेल्या 27 नगरसेवकांमुळे आता भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्या पात्रतेबाबत येत्या 11 जानेवारी रोजी नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, कोणते नगरसेवक पात्र ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहचलीय.

भाजपला धक्का

जळगाव महापालिकेत भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. महापौर निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. त्यात शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला. जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र, असे असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली आहे. मात्र, खरे नाट्य इथून पुढेच घडले आहे.

कोणाची होणार सरशी?

जळगाव महापालिकेतील महापौर, उपममहापौर निवडीवेळी भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांनी आपला स्वतंत्र ग्रुप स्थापन केला. त्यांनी बैठक घेऊन भाजपचे गटनेते, उपगटनेते यांची हकालपट्टी केली आणि नवीन पदाधिकारी नियुक्त केले. त्यात दिलीप पोकळे यांना गटनेते म्हणून नियुक्त केले. शिवाय प्रभाग समिती सभापती निवडीत त्यांनी आपलाच पक्ष भाजप असून, आपण दिलेल्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप भाजप नगरसेवकांना बजावला. मात्र, भाजप नगरसेवकांनी तो व्हीप स्वीकारला नाही. त्यामुळे दिलीप पोकळे यांनी 2 ऑगस्ट 2021 रोजी नगरसेवक सीमा भोळे यांच्यासह 29 नगरसेवकांना अपात्र करावे, अशी तक्रार पक्षाचे गटनेते म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली. या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भाजपच्या 29 नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार, भाजपचे नगरसेवक पात्र ठरणार की अपात्र आणि कोणत्या नगरसेवकांचा पक्ष भाजप ठरणार हे पाहणे मोठे रंजक असणार आहे.

इतर बातम्याः

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 59 अर्ज; कशी रंगलीय निवडणूक?

Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना निर्बंध वाढले; लग्नासाठी आता 50 वऱ्हाडी, जाणून घ्या नवे नियम…

Nashik Corona|नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा धडाका; तर वाढत्या संसर्गाने पुन्हा धडकी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें