AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Flat Rent: स्वप्ननगरीत स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा अवघड आहे फ्लॅटचे भाडे भरणं; सोशल मीडियावर व्हायरल होतोय तरुणाचा व्हिडिओ

मुंबईत दिवसेंदिवस घराचे भाडे वाढताना दिसत आहे. देशभरातून लोक मुंबईत आपले स्वप्न साकार करण्यासाठी येतात पण त्यांना भाड्याने राहणं काही परवडत नाही. असाच एक वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Flat Rent: स्वप्ननगरीत स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा अवघड आहे फ्लॅटचे भाडे भरणं; सोशल मीडियावर व्हायरल होतोय तरुणाचा व्हिडिओ
mumbai flat rent
| Updated on: Jun 22, 2026 | 1:13 PM
Share

मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते, अनेक लोक आपले घर सोडून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी या स्वप्ननगरीत येतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला पडणारा प्रश्न म्हणजे राहायचे कुठे? भाड्याने घर घेऊन सुरुवातीला काही लोक राहतात आणि नंतर आपले हक्काचे पण घर ते घेतात. पण सुरुवातीला भाड्याने राहणं प्रत्येकाचालाच परवडत नाही. मुंबईमध्ये महिन्याचे भाडे हे दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना भाडेच परवडत नाहीये तर घर विकत घेणं कुठुन परवडणार आहे. आता हेच वातस्व दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक जागरत थिरावानीने एका विनोदी व्हिडिओद्वारे हे वास्तव समोर आणले आहे, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, त्याने मुंबईतील जास्त भाडे आणि वाढता खर्च मजेशीरपणे मांडला आहे, ज्याने हजारो तरुण आणि विद्यार्थ्यांना आकर्षित केले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, जागृत थिरावानी एका अशा फ्लॅटमध्ये उभा असलेला दिसतो, ज्याला बाल्कनीसुद्धा नाही. हा फ्लॅट दाखवत, तो मुंबईत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना विनोदी पद्धतीने एक संदेश देतो. तो म्हणतो की, तो आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या शहरात आला, पण इथे आल्यावर त्याला जाणवले की सर्वात मोठी चिंता म्हणजे जास्त भाडे. तो म्हणतो की, आपली स्वप्ने पूर्ण करण्याऐवजी, मुंबईत येणारे अनेक नवीन लोक आपले मासिक भाडे कसे भरायचे या चिंतेतच अडकलेले असतात.

व्हिडिओच्या शेवटी, जागरत थिरावानीनेनी विनोदी सुरात लोकांना असा सल्ला देतात की, अशी स्वप्ने पूर्ण करा ज्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही, कारण त्यामुळे आयुष्य खूप सोपे होऊ शकते. हा व्हिडिओ विनोदी असला तरी, लोकांना त्यात एक महत्त्वाचे सत्यही दिसले. मुंबई हे देशातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक मानले जाते, जिथे लोक आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा भाड्यावर खर्च करतात. हे मुंबईचे भिषण वास्तव आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन