AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Mega Block : कसं? रविवारी घराबाहेर पडायचं की नाही? मेगाब्लॉकची अपडेट घ्या जाणून

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार १५ जून २०२५ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकलच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक एकदा नक्की वाचा.

Mumbai Local Mega Block : कसं? रविवारी घराबाहेर पडायचं की नाही? मेगाब्लॉकची अपडेट घ्या जाणून
mumbai local
| Updated on: Jun 13, 2025 | 9:14 PM
Share

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार १५ जून २०२५ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील CSMT ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावरही 5 तासांची मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना लोकलच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक एकदा नक्की वाचा.

मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचे वेळापत्रक

मध्य रेल्वे मार्गावरील CSMT ते विद्याविहार दम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या काळात ब्लॉक असणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या कालावधीत सुटणाऱ्या सर्व डाउन धीम्या लोकल ट्रेन CSMT आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबणार आहेत आणि विद्याविहारपासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या कालावधीत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या या विद्याविहार ते CSMT दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहेत.

हार्बर मार्गावरील ब्लॉकचे वेळापत्रक

हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या कालावधीत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेलवरून सकाळी 1.33 ते दुपारी 3.49 या कालावधीत CSMT सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच CSMT वरून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या कालावधीत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

पनवेलवरुन सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या कालावधीत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ठाण्यावरुन सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या कालावधीत पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.ब्लॉकच्या काळात CSMT ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. तसेच ठाणे – वाशी/ नेरुळ या दरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सुरु असणार आहे. त्याचबरोबर बंदर लाईन सेवादेखील उपलब्ध असणार आहे.या ब्लॉकच्या काळात प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.