
मुंबईकरांची लाईफलाईन असलेली, लाखो लोकांना रोज इच्छित स्थळी पोहोचवणाऱी लोकल सेवा हिला जरा विश्रांतीची, दुरूस्ती, देखभालीची गरज असतेच की. यामुळे मुंबईतल्या लोकल सेवांच्या मार्गांवर अर्थात मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर वेळोवळी ब्लॉक घेतला जातो. तसाच ब्लॉकचा थांबा शनिवारी रात्री घेतसा जाणार आहे. हार्बर मार्गावरील पनवेल येथे विविध अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी रात्री 12 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे बेलापूर-पनवेल लोकल सेवा उपलब्ध नसेल. तर पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सेवा बेलापूर, नेरळ, वाशी तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा नेरुळ, वाशी येथे रद्द केल्या जाणार आहेत.
पनवेल स्थानकाच्या फलाट क्र. 2 वर पायाभूत कामांसाठी बेलापूर ते पनवेल दरम्यान अप व डाऊन मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजून 45 मिनिटं ते रविवारी सकाळी 11.45 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळेच त्यामुळे रविवारी सकाळी सीएसएमटी-पनवेल आणि सीएसएमटी-वडाळा लोकलही रद्द असतील. हे वेळापत्र लक्षात घेऊन प्वरवाशांनी आपले प्लान आखावेत आणि प्रवासाची पर्यायी योजना आखावी असं आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे.
ब्लॉक दरम्यानचे वेळापत्रक
– शनिवारी रात्री 10.50 ची सीएसएमटी-पनवेल लोकल बेलापूरपर्यंत
– शनिवारी रात्री 10.55 ची ठाणे-पनवेल लोकल रद्द असेल.
– रविवारी सकाळी 9.28,11.28 ची पनवेल-सीएसएमटी लोकल वाशी येथून सुटेल
– रविवारी सकाळी 11.52 ची पनवेल-सीएसएमटी लोकल बेलापूर येथून सुटेल.
– रविवारी सकाळी 8.41, 10.01 ची ठाणे-पनवेल लोकल, सकाळी 9.04, 11.42 २ ची ठाणे-नेरूळ लोकल, सकाळी 10. 20 ची ठाणे-वाशी लोकल रद्द.
– रविवारी सकाळी 10.58 वाजताची वाशी-ठाणे, सकाळी 9.42 ची नेरुळ-ठाणे, सकाळी 7.43, 8.04, 9.01, 10.41 आणि 11.02 पनवेल-ठाणे लोकल रद्द असेल.
शेवटची कर्जत लोकल 12 दिवस अंबरनाथपर्यंत धावणार
दरम्यान मध्य रेल्वेवरील बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात उड्डाण पुलाच्या कामासाठी 12 दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज ट्रामिनल्स येथून रात्री 12 वाजून 12 मिनिटानी सुटणारी कर्जत लोकल अंबरनाथ पर्यंत धावणार आहे. तर रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी कर्जत येथून सुटणारी लोकल पुढील 12 दिवस अंबरनाथ येथून सुटेल. या ब्लॉकमुळे कर्जत, भिवपुरी, नेरळ, शेलू, वांगणी , बदलापूर येथील प्रवाशांची गैरसोय
होऊ शकते. शुक्रवार पासून सुरुवात झालेला हा ब्लॉक 3 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या ब्लॉकमुळे लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार