AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासरी, माहेरी जाताय? आधी टाईमटेबल पहा, मगच बाहेर पडा, रेल्वेचा ब्लॉक कुठे ?

मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक आहेत. यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांना वेळापत्रकात बदल करावा लागू शकतो.

सासरी, माहेरी जाताय? आधी टाईमटेबल पहा, मगच बाहेर पडा, रेल्वेचा ब्लॉक कुठे ?
रेल्वेचा ब्लॉक कुठे ?
| Updated on: Feb 22, 2025 | 9:33 AM
Share

रविवार.. हा सुट्टीचा दिवस असला तरी कामानिमित्त, तर कधी फिरायला जाण्यासाठी किंवा कुटुंबियांची भेट घेण्यासाठी असंख्य मुंबईकर बाहेर पडत असतात. कार किंवा रिक्षाने जाऊन ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा अनेक जण रेल्वेना स्वस्त आणि मस्त, मुख्यत: वेगाने प्रवास करणं प्रेफर करतात. सुट्टी पाहून, मुंबईकरांनी तुम्ही देखील बाहेर पडण्याचा आणि रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एक मिनिट थांबा. कारण मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी केवळ मध्यच नव्हे तर पश्चिम आणि हार्बर मार्गावरही ब्लॉक असेल. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक ?

मध्य रेल्वेवरील अंबरनाथ ते वांगणीदरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रात्रीच्या वेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. अंबरनाथ ते वांगणीदरम्यान पादचारी पुलाच्या कामानिमित्त शनिवारी रात्री 1.30 ते रात्री 3 वाजेपर्यत अप आणि डाऊन मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे कोणार्क एक्सप्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल येथे थांबवण्यात येईल. तर, रात्री 11.13 वाजताची परळ-अंबरनाथ लोकल बदलापूर स्थानकापर्यंत चालवण्यात येईल.

रात्री 11.51 वाजताची सीएसएमटी ते बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येईल. तर रात्री 12.12 वाजताची सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. रात्री 2 वाजून 30 मिनिटांची कर्जत-सीएसएमटी लोकल कर्जतऐवजी अंबरनाथ स्थानकावरून सुटेल.

रविवारचं वेळापत्रक कसं असेल ?

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत ब्लॉक असेल. यादरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद आणि अर्ध जलद लोकल गाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत, त्यामुळे त्या कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. याचप्रमाणे, कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद आणि अर्ध जलद लोकल गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान धीम्या मार्गावर धावतील आणि नंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर कशी असेल परिस्थिती ?

तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान उद्या जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. हा ब्लॉक सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत घेतला जाणार आहे. या कालावधीत या मार्गावरील सर्व जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावरून धावतील. त्याशिवाय, काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगावपर्यंतच चालवल्या जातील.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?