AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकलमध्ये रक्तरंजित थरार… दरवाजा बंद करायला सांगताच संताप, प्रवाशालाच भोसकलं; मुंबई हादरली

काल रात्री मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात धक्कादायक घटना घडली. पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून मयंक लोहार या तरुणाला धारदार शस्त्राने भोसकण्यात आले. अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान रात्री १० वाजता घडलेल्या या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकलमध्ये रक्तरंजित थरार... दरवाजा बंद करायला सांगताच संताप, प्रवाशालाच भोसकलं; मुंबई हादरली
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 24, 2026 | 11:38 AM
Share

मुंबईत सध्या तूफान पाऊस सुरू असून दोन दिवसांपासून पावसाच्या सरी सतत कोसळत आहेत. मात्र या पावसात मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. पाऊस सुरु असताना लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं, त्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला भोसकण्यात आलं. धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मयंक लोहार या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान काल रात्री 10 वाजताच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर तो वाद टोकाला गेला आणि त्यातच मयंकने आपला जीव गमावला.

मुंबईत काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेवरती बोरिवली जवळ एक घटना घडली होती. लोकलच्या दरवाज्यात उभं राहण्यावरून झालेल्या वादानंतर एकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार मंगळवारी रात्री पश्चिम रेल्वे मार्गावर घडला. काल रात्री जोरदार पाऊस पडत होतो, तो लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातही आत येत होता. त्यामुळे त्या डब्यात बसलेल्यांनी दरवाजा बंद करण्यास सांगितला म्हणून दोन प्रवाशांमध्ये जोरदर वाद झाला. पाहात पाहता तो वाद प्रचंड वाढला आणि टोकाला गेला. रागाच्या भरात एकाने धारदार शस्त्राने दुसऱ्या तरूणावर जोरदार वार केला.

या भयानक हल्ल्यात जखमी झालेल्या 22 वर्षीय मयंक लोहार या तरूणाचा ट्रेनमध्येच मृत्यू झाला. मात्र त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी अजूनही फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. अंधेरी ते बोरिवली दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.  जवळपास चार ते पाच महिन्यातील, मुंबईतील ही अशी दुसरी घटना आहे. अत्यंत गंभीर आणि धक्कादायक हा प्रकार असून प्रवाशांच्या मनातही दहशत आहे.

सध्या बोरिवली लोहमार्ग पोलिस या संपूर्ण प्रकाराची  चौकशी करत असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत