AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Mega Block Updates : दिव्यातील नव्या पुलासाठी ब्लॉक; ठाणे- कल्याण दरम्यान लोकल 4 तास बंद , अनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सूचना काय ?

मध्य रेल्वे दिवा स्थानकातील नव्या पादचारी पुलाच्या कामासाठी ४ तासांहून अधिक काळ ब्लॉक घेणार आहे, ज्यामुळे ठाणे-कल्याण लोकल सेवा बंद राहतील. या वीकेंडला मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवर विविध कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर झाला आहे. अनेक लोकल रद्द किंवा उशिराने धावणार असल्याने, प्रवासाचे नियोजन करून सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai Mega Block Updates : दिव्यातील नव्या पुलासाठी ब्लॉक; ठाणे- कल्याण दरम्यान लोकल 4 तास बंद , अनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सूचना काय ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 13, 2026 | 9:47 AM
Share

मुंबईकरांसाठी एक विशेष, महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवा स्थानकात नव्या पादचारी पुलाच्या तुळ्या उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी रात्री ब्लॉक घेण्यात येणार असून ठाणे-कल्याणदरम्यान लोकल सेवा चार तासांहून अधिककाळ बंद असेल. शनिवारी मध्यरात्री 1.20 ते रविवारी पहाटे 5.40 या वेळेत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या कालावधीत कळवा–डोंबिवलीदरम्यान अप आणि डाऊन धीम्या तसेच जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहतील. परिणामी, ठाणे–कल्याणदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेने काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्याचा, तर काही गाड्या अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक गाड्या रद्द

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी पहाटे धावणाऱ्या अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचा प्रवास ठाणे, कुर्ला आणि परळ स्थानकांवरच संपवण्यात येईल, तर काही गाड्या त्यांच्या मूळ स्थानकांऐवजी कुर्ला, ठाणे किंवा कल्याण येथून सुरू करण्यात येतील. तसेच ब्लॉकच्या काळात कल्याणहून सुटणाऱ्या काही अप धीम्या लोकल गाड्या ठाण्यापर्यंत अप जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच त्या सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. या ब्लॉकचा प्रवाशांना फटका बसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या विशेष ब्लॉकचा परिणाम मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरही होणार आहे. गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 12810 हावडा–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या कल्याण–ठाणेदरम्यान सहाव्या मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे त्या त्यांच्या गंतव्यस्थानी 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचू शकतात.

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक

दरम्यान मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून, रेल्वे रुळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर पायाभूत सुविधांच्या देखभाल व उभारणीची कामे केली जाणार आहेत. तसेच शीव येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे शनिवारी मध्यरात्री 12.10 ते रविवारी पहाटे 4.10 दरम्यान सीएसएमटी–कुर्ला मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील.

याशिवाय पश्चिम रेल्वेवर भायखळा–विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री 12.45 ते पहाटे 3.45 या वेळेत ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी–चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 पर्यंत ब्लॉक राहणार आहे. तसेच वांद्रे–गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे सीएसएमटी–वांद्रे अप आणि डाऊन सेवा, पनवेल–गोरेगाव–सीएसएमटी मार्गावरील लोकल तसेच चर्चगेट–गोरेगाव धीम्या मार्गावरील लोकल सेवा संबंधित कालावधीत बंद राहणार आहेत. प्रवाशांनी याची दखल घेऊन, त्याप्रमाणेच आपला प्रवास प्लान करावाा, अशा सूचना रेल्वेतर्फे देण्यात आल्या आहेत.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर