AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Suman Nagar Ward 155; प्रभाग 155 सुमन नगर मध्ये येणार महिला राज! कोण मारणार येथे बाजी

मागील निवडणूकीत प्रभाग 155 सुमन नगर हा प्रभाग अनुसूचित जाती राखीव होता. मात्र यावेळी सर्व र्साधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. येथे महिलांमध्ये येथे जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

BMC Election 2022 Suman Nagar Ward 155; प्रभाग 155 सुमन नगर मध्ये येणार महिला राज! कोण मारणार येथे बाजी
मुंबई महानगरपालिकाImage Credit source: tv9
| Updated on: Jun 08, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूकीची रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. त्याआधी महापालिकेची (bmc) आरक्षण सोडत (reservation) झाली आहे. यामुळे अनेक मात्तबरांच्या मेहनीतीवर आणि त्यांच्या स्वप्नांवर आता पाणी फिरले आहे. काही प्रभागात आरक्षण हे बदलले गेले आहेत. तर काही प्रभागात मागील प्रमाणेच आरक्षण पडले आहे. त्यामुळे अनेकांना मनातल्यामनात गुदगुल्या होत आहेत. तर अनेकांना हे काय झालं असा धक्का बसला आहे. आरक्षण बदलल्यामुळे दुसरा वॉर्ड शोधण्याशिवाय आता काहींपुढे प्रस्ताव नाही. तर अनेकांना ही संधी म्हणजे सोनं. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना नव्या मतदारसंघातून लढावे लागणार आहे. तर त्यानुसार गेल्या तीन निवडणुकीत जे मतदारसंघ ओपन होते त्यांना या निवडणुकीत ओपन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अनेक प्रभाग हे ओपन झाले आहेत. ज्याचा अनेकांना फायदा होणार आहे. तर यावेळी निवडणूकीला अजून बराच अवधी असल्याने अनेकांना मतदारसंघ शोधण्यासह वॉर्डाच्या बांधणीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे. तर मागील निवडणूकीत प्रभाग 155 (Ward 155 election) सुमन नगर हा प्रभाग अनुसूचित जाती राखीव होता. मात्र यावेळी या प्रभागावर सर्व र्साधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे श्रीकांत गोविंद शेट्ये यांना थांबावे लागणार आहे. तर प्रभाग 155 सुमन नगरमध्ये आता महिला राज कोणाचं असणार हे पाहायला मिळणार आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वॉर्ड क्र.वॉर्ड क्र.155 सुमन नगर (एम – पश्चिम प्रभाग)

या प्रभागात म्हैसूर कॉलनी, माहुल गाव, सुमन नगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी, भक्तीपार्क ही प्रमुख ठिकाणे येतात. येथे एकूण लोकसंख्या 61530 असून यात अनुसूचित जातीचे 11551 तर अनुसूचित जमातीचे 841 लोकसंख्या आहे.

वॉर्ड क्र.वॉर्ड क्र.155 सुमन नगरची सीमा

उत्तर: प्रभाग क्रमांक १५२, १७० (वि. एन. पुरव मार्ग) पूर्व: वॉर्ड क्र. 147,148,154 (रिफायनरी रेल्वे लाईन, ‘M/W’ आणि ‘M/E’ वॉर्डांची सामायिक सीमा) दक्षिण: प्रभाग क्रमांक – (BMC, खाडीची हद्द) पश्चिम: प्रभाग क्र.१७३, १७४, १८१ (‘एम/डब्ल्यू’ आणि ‘एफ/एन’ प्रभागांची सामाईक सीमा)

Mumbai Corporation Ward 155 महापालिका निवडणूक उमेदवार

आप्पासाहेब आनंदाराव आवचारे राष्ट्रीय समाज पक्ष 2653

अॅड. विज्ञान शाम डावरे अपक्ष 143

दुनबळे उत्तम दामोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 3587

गायकवाड विष्णू भानुदास नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 973

घोक्षे रमेश गोपीनाथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) 1122

काळे सचिन विश्वानाथ अपक्ष 176

कांबळे विनोद परमेश्वर ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन 566

विद्यानंद लक्ष्मण खरात (पत्रकार) अपक्ष 78

मोकल मनिषा सचिन अपक्ष 34

नगराळे राजेंद्र श्रीराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 5199

जयाताई प्रमोद पगारे बहुजन समाज पार्टी 326

पोळ प्रविण परमेश्वर भारिप बहुजन महासंघ 2954

रामफुले मधुकर लक्ष्मण बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 312

शेट्ये श्रीकांत गोविंद शिवसेना 8013 (विजयी)

NOTA NOTA 778

एकूण 26971

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.