BMC Election : उमेदवारी न मिळाल्याने लढवली शक्कल, चक्क डुप्लिकेट एबी फॉर्म जोडत केला अर्ज, भाजपमध्ये खळबळ

पक्षाकडून हा फॉर्म नजरचुकीने देण्यात आला होता, नंतर तो फॉर्म परत घेण्यात आला. मात्र इच्छुक उमेदवाराने त्याचा फॉर्मचा डुप्लीकेट एबी फॉर्म तयार करून तो अर्जासोबत जोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

BMC Election :  उमेदवारी न मिळाल्याने लढवली शक्कल, चक्क डुप्लिकेट एबी फॉर्म जोडत केला अर्ज, भाजपमध्ये खळबळ
उमेदवाराकडून डुप्लीकेट अर्ज भाजापत गोंधळ
| Updated on: Jan 01, 2026 | 8:32 AM

मुंबईसह राज्यातील 29 महानगरापालिकांच्या निवडणुकांच्या मतदानासाठी (Municipal Elections) आता अवघे ताही दिवस उरले असून दोनच दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपली. राज्यातील विविध पक्षांकडून अनेक इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आले. मात्र काहींना संधीच मिळाली नाह, त्यामुळे अनेक इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी पडले, काही नाराज झाले तर काहींनी थेट पक्षांतर केलं. मात्र अशातच मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. भाजपच्या एका इचछुक उमेदवाराने घातलेल्या घोळामुळे चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर नामुष्की ओढावली असून त्यांना थेट निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्याची वेळ आली.

महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असूनही पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने चक्क डुप्लीकेट एबी फॉर्म जोडून अर्ज केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वॉर्ड क्रमांत 173 मधून शिल्पा केळुसकर यांनी त्यांच्या अर्जासोबत चक्क डुप्लीकेट एबी फॉर्म जोडला आणि त्यासह हा अर्ज सादर केलं. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच एकच खळबळ माजली. मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी याप्रकरणी तातडीने पावलं उचलत निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली. उमेदवाराने डुप्लीकेट फॉर्म जोडल्याचे नमूद करत त्यांनी हा एबी फॉर्म रद्द करण्याचीही मागणी केली.

भाजपाकडून अर्ज रद्द करण्याची मागणी

सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपकडून मुंबईत अनेक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. मुंबईतील वॉर्ड 137 मध्ये शिल्पा केळुसकर या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. मात्र त्यांना पक्षाकडून नजरचुकीने फॉर्म देण्यात आला होता. ते लक्षात आल्यावर भाजपने केळुसकर यांच्याडून तो फॉर्म परत घेतला. निवडणूक लढवण्याची इच्छआ असूनही उमेदवारी न मिळाल्याने केळुसकर यांनी शक्कल लढवली आणि चक्क पक्षाचा डुप्लिकेट एबी फॉर्म जोडत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला, एकच खळबळ माजली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी तातडीने पावलं उचलली आणि निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं. केळुसकर यांनी बनावट फॉर्म भरल्याचे नमूद करत तो अर्ज रद्द करावा अशी मागणी या पत्रातून साटम यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली असून तक्रारही नोंदवण्यात आली आहे. मात्र आता केळुसकर यांचा हा अर्ज रद्द होतो की कायम ठेवला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

भाजपच्या उमेदवारांची यादी

तेजस्वी घोसाळकर, प्रकाश दरेकर, गणेश खणकर, योगिता पाटील, शिवानंद शेट्टी, जितेंद्र पटेल, राणी द्विवेदी, सिमा शिंदे, जिग्ना शहा, श्वेता कोपरगावकर, शिल्पा सांगोरे, दक्षता कवठणकर, दीपक तावडे, लिना देहरकर, हिमांशु पारेख, शिवकुमार झा, स्वाती जयस्वाल, निशा परूळेकर, प्रितम पंडागळे, निलम गुरव, नितीन चौहान, धवल वोरा, मनीषा यादव, उज्वला वैती, सॅमुअल डेनिस, योगेश वर्मा, सिद्धार्थ शर्मा, प्रतिभा शिंदे, संजय आव्हाड, विनोद मिश्रा, संगिता शर्मा, संजय कांबळे, योगिता कोळी, तेजिंदर सिंग तिवाना, सुमित्रा म्हात्रे, विक्रम राजपूत, प्रती सातम, विल्पव अवसरे, हर्ष पटेल, राजुल देसाई, श्रीकला पिल्ले, संदीप पटेल, योगिराद दाभाडकर, सायली कुलकर्णी, रूपेश सावरकर, सरीता राजपुरे, विठ्ठल बंदेरी, आरती पंड्या, दीपक कोतेकर, रोहन राठोड, सुधा सिंह, अनिश मकवानी, सुनिता मेहता, ममता यादव, उज्वला मोडक, उमेश राणे, प्रकाश मुसळे, दिशा यादव, केशरबेन पटेल, जगदिश्वरी अमिन, अंजली सामंत, मिलिंद शिंदे, कृष्णा पारकर, प्रज्ञा सामंत, ज्योती उपाघध्याय, सुहास आडिवरेकर, हेतल गाला, अलका केरकर, जितेंद्र राऊत, स्वप्ना म्हात्रे, अनुश्री घोडके, निलेश हंडगर, हेतल मोरवेकर, प्रकाश गंगाधरे, अनिता वैती, प्रभाकर शिंदे, नील सोमैय्या, दिपिका घाग, जेनी शर्मा, सारीका पवार, साक्षी दळवी, स्मिता परब, जागृती पाटील, चंजन शर्मा अनिल निर्मळे, अर्चना भालेरावस अलका भगत, अश्विनी मते, धर्मेश गिरी, राखी जाधव, रितु तावडे, नवनात बन, श्रृतिका मोरे, दिनेश पांचाळ, सुषम सावंत, वनिता कोकरे, काशिश फुलवारिया, आशा मराठे, महादेव शिवगण, वर्षा शेट्ये, आशा तायडे, आकाक्षां शेट्ये प्रकाश मोरे